spot_img
spot_img

डोणगावात पलसिद्ध धर्मपीठाच्या गुरुदिक्षा कार्यक्रमाची भव्य सुरुवात!

डोणगाव (हॅलो बुलडाणा/अनिल राठोड) डोणगाव नगरीत श्रीमद् 1008 जगद्गुरू पलसिद्ध महास्वामीजी यांच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठेच्या वर्धापन दिन महोत्सवाची भव्य सुरुवात झाली असून, दि. 19 डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजता श्री सद्गुरू सिध्द चैतन्य शिवाचार्य महाराज साखरखेर्डा यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुदिक्षा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

पलसिद्ध धर्मपीठ शाखा डोणगावच्या वतीने दि. 16 डिसेंबरपासून सुरू झालेल्या या महोत्सवात श्री ष ब्र. 108 प पू शिवाचार्य रत्न, वेदान्ताचार्य सद्गुरू सिध्दलिंग शिवाचार्य स्वामीजी यांच्या प्रेरणेने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

या गुरुदिक्षा कार्यक्रमासाठी अनेक भावी भक्तांनी नोंदणी केली असून, वीरशैव लिंगायत समाजातील मान्यवर मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. वर्धापन दिन महोत्सवात जगद्गुरू पलसिद्ध महास्वामीजी यांच्या मूर्तीवर रुद्राभिषेक, पलसिद्ध चरित्रामृत व परमहंस्य ग्रंथाचे पारायण, सामूहिक भजन व शिवपाठ असे धार्मिक कार्यक्रम सुरु आहेत.

भाविक भक्तांसाठी विशेष आवाहन:
परिसरातील सर्व वीरशैव लिंगायत समाज व इतर समाजातील श्रद्धाळू भक्तांनी या पवित्र गुरुदिक्षा सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री पलसिद्ध सेवा संघ व भाविक भक्त मंडळी यांनी केले आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!