चिखली (हॅलो बुलडाणा/सैय्यद साहील)श्री. राजाभाऊ बोंद्रे नगर परिषद माध्यमिक व उर्दू उच्च माध्यमिक विद्यालय, चिखली येथील शाळा व्यवस्थापन समितीच्या निवडणुकीत अध्यक्षपदी अजीम खान राजदर खान यांची तर उपाध्यक्षपदी गणेश रमेश बोर्डे यांची बहुमताने निवड झाली आहे.
अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अजीम खान यांनी ६ मते मिळवून विजय मिळवला, तर महिला उमेदवाराला ४ मते आणि सलीम परवेज यांना १ मत मिळाले. चुरशीच्या निवडणुकीत वर्ग ६ ते ८ मधील पालकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
नवीन शाळा व्यवस्थापन समितीच्या इतर सदस्यांमध्ये सलीम परवेज खान अ. सत्तार, शेख जावेद शेख करामत, रईसा बी मजीद खान, असामा परवीन शेख सलीम, नजेमा परवीन दिलषाद अली, रुबीना बी सैय्यद शगीर, रमेश भुजंगराव अंभोरे, वर्षा गणेश बोर्डे, आणि लक्ष्मी देवेंद्र भोंडे यांचा समावेश आहे.
शाळा व्यवस्थापनासाठी नव्या समितीकडून सकारात्मक बदलांची अपेक्षा!