spot_img
spot_img

💥 EXCLUSIVE – आमदार संजय गायकवाड यांच्या 8 जणांविरोधात तक्रारी! – म्हणाले पक्ष विरोधी काम केले! -डॉ.संजय कुटे यांचाही मंत्री पदातून पत्ता तक्रारीमुळे कट?

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी दुसऱ्यांदा निसटता विजय मिळवला.परंतु या विजयाने ते समाधानी नाहीत. त्यामुळे त्यांनी हिवाळीअधिवेशन दरम्यान महायुती विरोधात काम करणाऱ्या 7 ते 8 जणांच्या तक्रारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केल्या आहेत. त्यामुळेच की काय डॉ. संजय कुटे यांना यंदा मंत्री पदापासून वंचित रहावे लागले? हा प्रश्न चर्चिला जाऊ लागला आहे.

आमदार गायकवाड यांनी आपल्याच पक्षाच्या 7 ते 8 जणांची तक्रार एकनाथजी शिंदे यांच्याकडे केली आहे.विशेष म्हणजे यामध्ये आयुष मंत्री प्रताप जाधव यांचे नाव तर डॉ संजय कुटे यांचे नाव देखील आमदार गायकवाड यांनी घेतले परंतु आणखी 5 ते 6 जणांची तक्रार त्यांनी केली आहे.त्यांचे नाव मात्र त्यांनी सांगितले नाही.लोकसभेत आणि विधानसभा निवडणुकीत पक्षविरोधी कार्यकर्त्यांनी ज्यांनी ज्यांनी काम केले त्यांच्या वरिष्ठांकडे तक्रारी केल्याचे गायकवाड 9म्हणाले.संजय कुटे यांना मंत्रीपद का मिळाले नाही? यावर प्रश्न केला असता गायकवाड म्हणाले की ते पाचव्यांदा निवडून आले त्यांना ते पद मिळायला पाहिजे होते परंतु त्यांना मिळाले नाही ते त्यांच्या पक्षांतर्गतची बाब आहे.गायकवाड यांनी तक्रार केल्यामुळे कुटे यांना मंत्रीपदा वरून वगळण्यात आले अशीही चर्चा रंगत आहे.दरम्यान आकाश फोन कर यांची मंत्रीपदी वरील लागल्याने गायकवाड यांनी त्यांचे समर्थन दर्शविले.दरम्यान ही तक्रार मीच न करता आणखी सिंदखेड राजा आणि मेहकर येथील पराभूत उमेदवारांनी केल्याची स्पष्टोक्ती गायकवाड यांनी दिली.पक्षश्रेष्ठी योग्य वेळी या तक्रारीची दखल घेतील असे गायकवाड यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!