बुलढाणा (हॅलो बुलडाणा) वारंवार अपघात घडताहेत. वाहनांच्या वेगावर अंकुश राहिला नाही.कुण्या तरी अज्ञात वाहनाने आत्ता थोड्यावेळापूर्वी
सिंदखेड राजा तालुक्यातील शेलु येथील भोसा घाटात एका दुचाकीस्वाराला उडविले आहे.या व्यक्तीची बॉडी जंगलात पडलेली असून तो ठार झालेला असावा असेच विदारक दृश्य आहे.
सिंदखेड राजा तालुक्यातील भोसा ते चिंचोली रस्त्याच्या बाजूच्या जंगलात हा अपघात झाला. सदर दुचाकी स्वाराच्या दुचाकी वर एडवोकेट असलेले चिन्ह आहे.या दुचाकी चा नंबर एपी 09 बीके 5256 असा आहे.तेथील काही लोकांनी 108 वर फोन करून ॲम्बुलन्स बोलवली आणि यांची पोलिसांना माहिती दिल्याचे समजते.










