spot_img
spot_img

💥चिंताजनक ! पालकांनो पाल्यांकडे वेळीच लक्ष द्या, अन्यथा… – क्लासेस सोडून मुलींसोबत गुलुगूलू बोलणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रभाकर वाघमारे यांनी कान टोचले!

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) शहरात अनेक शिकवणी वर्ग आहेत.आई वडील आपल्या पाल्यांना शिक्षण देण्यासाठी जीवाचं रान करतात.वारेमाप पैसे खर्च करून पाल्यांना घडविण्याचा प्रयत्न करतात. परंतु काही पाल्य क्लासेसला येऊन टवाळखोरी करीत असल्याने समाजसेवक प्रभाकर वाघमारे यांनी आज काही टवाळखोरांचे कान टोचले आहे.

शहरासह ग्रामीण भागात मुली पळून जाण्याच्या घडत असलेल्या घटना व महिलांबाबतीत होत असलेल्या विनयभंगाचे दाखल होत असलेले गुन्हे पाहता, पालकांनी आपल्या पाल्याकडे लक्ष देणे गरजेचे बनले आहे. अन्यथा अनेक समस्यांना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.
गेल्या काही महिन्यांपासून मुली पळून जाण्याच्या घटना घडत आहेत. मुलगी पळवून नेल्याच्या तक्रारी पोलीस ठाण्यात येत आहेत. अशा प्रकारच्या तक्रारींचे वाढत असलेले प्रमाण पालकांसाठी चिंताजनक आहे. यातील अनेक प्रकरणे बदनामीच्या भीतीमुळे पोलीस स्टेशनपर्यंत येत नाहीत. दोन दिवसआड कुठे ना कुठे मुलगी पळून गेली किंवा पळवून नेल्याची तक्रार येते. पळून जाणाऱ्या युवक व युवतीचे वय १८ किंवा त्यावरील आहे. आयुष्य काय आहे, कसे जगायचे आहे किंवा त्यातील चढ-उतार काय असतात, भविष्यात याचे होणारे परिणाम याची पुसटशीही कल्पना त्यांना नसते. ही मुले सरळ विवाह करून परतात. यावेळी त्या पालकांची काय अवस्था होत असेल? केवळ क्षणिक सुखाच्या प्रेमापोटी हे सर्व घडत आहे. काही दिवसांत तर दोन-चार दिवसआड मुलगी गेल्याच्या घटना घडत आहेत.

▪️यंत्रणा काय करू शकते?

छेडछाड विरोधी पथक गठीत करून नियमित शाळा महाविद्यालय व क्लासेस परिसरात पेट्रोलिंग करण्यात यावी.महिला हेल्पलाईन कार्ड वाटण्यात यावे.विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक शाळेत पंधरा दिवसातून एकदा प्रबोधन वर्ग कार्यान्वित करावा यासह यंत्रणेने इतरही उपक्रम राबवणे गरजेचे आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!