चिखली (हॅलो बुलडाणा) मेरा बु.अंत्री खेडकर पाटालाखडक पूर्णा धरणाचे पाणी सोडण्यात यावे तसेच या पाटाच्या कामाची गुणवत्ता तपासणी करण्यात यावी, 25 डिसेंबर पर्यंत पाणी न आल्यास 26 जानेवारीला गणराज्य दिनी मेरा बुद्रुक कालव्यावर आमरण उपोषण करण्याचा इशारा,मेरा बुद्रुक ची माजी सरपंच पती सुनील पडघान व ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी यांना लेखी निवेदनातून दिला आहे.
चिखली तालुक्यातील मौजे मेरा बु अंत्री खेडेकर येथे 2012/13 दरम्यान खडकपूर्णा प्रकल्पाचे कालवे करण्यास सुरुवात झाली होती परंतु आज 10 वर्षे होऊन सुद्धा खडकपूर्णा प्रकल्पाच्या कालव्याचे काम अर्धवट असल्यामुळे अंत्रीखेडेकर,मेरा बुद्रुक येथे पाटाचे पाणी आलेच नाही आणि जे काम झाले आहे ते एकदम निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप आहे. त्यामध्ये कोणत्याही कामाची क्वालिटी दिसून येत नाही, अशा आशयाचे निवेदन मेरा बुद्रुक येथील माजी सरपंच पती सुनील माधवराव पडघान,अशोक सिताराम पडघान, रमेश साहेबराव पडघान,आनंदा शामराव पडघान यांनी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालय येथे दिले आहे. अंत्री खेडेकर या कालव्याचे काम पूर्ण करून खडकपूर्णांमधून कालव्याला पाणी सोडण्यात यावे आणि झालेल्या कामाचे गुण नियंत्रक विभागाकडून पाहणी करण्यात यावी तसेच 25 डिसेंबर पर्यंत पाणी न आल्यास मेरा बुद्रुक येथील रहिवासी मेरा बुद्रुक कालव्यावर 26 जानेवारीला आमरण उपोषण उपोषण करू,असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.