मेहकर (हॅलो बुलडाणा) तेलंगणा या बाहेर राज्यातून हरविलेली महिला मेहकर पोलिसांच्या मदतीने तिच्या कुटुंबात परतली आहे.
12 डिसेंबर रोजी मेहकर पोलीस स्टेशन मधील पोलिस अंमलदार सुखदेव ठाकरे,पोलीस आमदार शिवानंद तांबेकर यांची रात्री पेट्रोलिंग सुरू होती.दरम्यान बस स्थानकावर थंडीत एक 30 वर्षीय महिला कुडकडत होती.पोलिसांनी तिला नाव विचारले असता ती तेलगू भाषेत बोलत होती. तिला मराठी -हिंदी- इंग्रजी भाषा समजत नव्हती.दरम्यान महिला पोलिस अंमलदार सोफिया पठाण, राणी जामदार यांना बोलावून सदर भटक्या महिलेची चौकशी केली असता तिच्या थैलीत आधारकार्ड आढळून आले. तिचे नाव शोभा यलमा रा. करमपेली निजामाबाद, तेलंगणा असे असून पोलिसांनी कॉल करून या महिलेच्या नातेवाईकांना संपर्क साधला असता, सदर महिलाही मतिमंद असल्याचे सांगण्यात आले. नातेवाईकांना मेहकर पोलीस ठाण्याला बोलाविण्यात आले.एस पी विश्व पानसरे,प्रदीप पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी मेहकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक भाऊराव घुगे, वसंत पवार, सुखदेव ठाकरे, शिवानंद केदार, राजेश उंबरकर, शिवानंद तांबेकर, करीम शहा, सोफिया पठाण, राणी जामदार यांच्या मदतीने सदर हरवलेली महिला तेलंगणातील तिच्या कुटुंबात परतल्याने त्यांच्या कुटुंबाचा आनंद शतोगुणीत झाल्याचे पाहायला मिळाले.