spot_img
spot_img

डॉ मधुसूदन सावळेजी विधानसभा लढणे ‘आपके बस की बात नही!’- निवडणुकीचा पॅटर्नच वेगळा

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) लोकसभेत उबाठा गटाचा पराभव झाला असला तरी, बुलढाणा विधानसभा मतदारसंघात उबाठाचा उमेदवार 2200 मतांनी पुढे राहिला. त्यामुळे उबाठा गटातील अनेक इच्छुक गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहे. मात्र, दोन्ही निवडणुकांची स्थानिक समीकरणे, राजकीय मुद्दे आणि मतदानाचा पॅटर्न वेगवेगळा आहे हे देखील विसरून चालणार नाही. त्यामुळे इच्छुक असलेल्या डॉ. मधुसूदन सावळे यांना आगामी विधानसभा निवडणूक ‘आपके बस की बात नही’ असे जाणकार म्हणत आहेत.

बुलढाणा लोकसभेत ना.एकनाथ शिंदे यांची उमेदवार प्रतापराव जाधव निवडून आलेत. तर बुलडाणा विधानसभा मतदार संघात उबाठाचा उमेदवार २२०० मतांनी पुढे असल्यामुळे उबाठावर निवडणुक लढवण्यासाठी अनेकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.आधीच इच्छुक असलेल्या जिल्हा प्रमुख
जालिंदर बुधवत, डॉ.मधुसूदन सावळे, संजय हाडे यांच्यासह इतर पक्षातील नेत्यांचीही रांग लागलेली आहे. मात्र निष्ठावंत हा शब्दप्रयोग करून बुलडाणा विधानसभेची जागा सुटावी असा आशावाद व्यक्त करण्यात आला. तर बुलडाण्याचे तिकीट आपल्यालाच मिळावे, अशी इच्छा जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांनी खासदार अरविंद सावंताकडे बोलुन दाखवली.उबाठाच नव्हे तर महाविकास आघाडीचा उमेदवार या ठिकाणी पराभूत झाल्याने व मुस्लीम समाजाची निर्णायक मते महाविकास आघाडीतील उबाठा गटाला मिळाल्याने तीन लाखाचे वर उमेदवार पोहचला. त्यातच घाटाखालील जळगाव व खामगाव तसेच सिंदखेडराजा, मेहकर वगळता बुलडाणा व चिखली मतदार संघात महाविकास आघाडीला यश मिळाले आहे.त्यामुळे आता उबाठाकडे नेत्यांचा कल बघता, स्पर्धेत रंगत येणार आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!