धाड (हॅलो बुलडाणा) आजचा दिवस अपघात वार ठरला असून आज 12 डिसेंबर रोजी तिसरा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे.
धाड येथे हॉटेल जगदंब समोर तीन चाकी ॲपेने पायी चालणाऱ्या एका व्यक्तीला उडविल्याने त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून, सदाशिव चव्हाण असे या अपघातग्रस्ताचे नाव आहे.
धाड येथून जवळच असलेल्या करडी फाट्यानजीक पेट्रोल पंपा जवळील राजलक्ष्मी बार समोर 2 दुचाक्यांचा अपघात होऊन 1 जण दगावला आहे.दरम्यान याच परिसरात 2 टू व्हीलर चा अपघात झाला पण सुदैवाने कोणी जखमी झाले नव्हते.परत संभाजीनगर मार्गावरील हनुमान मंदिराजवळ हा अपघात झाला होता. तर आता दिवसातील तिसरा अपघात धाड येथील हॉटेल जगदंब समोर झाला आहे.










