spot_img
spot_img

💥💥BIG BREAKING! बुलढाण्याच्या कॅप्री ग्लोबल कॅपीटल लि.कंपनीच्या शाखेत ‘महाघोटाळा!’ -नकली सोन्याचे दागिने तारण ठेवून 26,21,472 रुपयांचा अपहार! -साह.प्रबंधकासह 9 कर्मचारी व चेकर मेकर यांच्यावर गुन्हे दाखल!

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) कॅप्री ग्लोबल कॅपीटल लि.कंपनीच्या बुलढाणा शाखेत बनावट सोन्याचे दागिने,आभूषण तारण ठेवून कंपनीची फसवणूक करीत तब्बल 26,21,472 रुपयांचा अपहार केल्याचे समोर आले आहे.

बुलढाणा शहरातील जनता चौकात कॅप्री ग्लोबल कॅपीटल लि.कंपनीची शाखा आहे. या शाखेतून सोन्याचे दागिने तारण ठेवून गरजवंत खातेदारांना कर्ज दिले जाते.मात्र या शाखेतील सहा. शाखा प्रबंधक प्रविण गरकल, माजी एरिया मॅनेजर माधव लटपटे, दिपाली साळवे,आश्विनी नागरे, राजेंद्र मोरे, अक्षय बरडे, किशोर बिबे, निलेश सारवळकर यांच्यासह सर्व चेकर व मेकर यांच्या विरोधात परेल – मुंबई या मुख्य कंपनीच्या नागपूर विभाग अंतर्गत येणारे एरिया मॅनेजर अरुण कुमार राठोड रा. नांदेड यांनी तक्रार दिल्याने सर्व आरोपींवर पोलिसांनी भान्यासं (बीएनएस) नुसार 3(5),316(2)318(4) गुन्हा दाखल केला आहे.

▪️ आरोपींनी काय केले?

कॅप्री ग्लोबल कॅपीटल लि. कंपनीच्या बुलढाणा शाखेत 3 ऑगस्ट 2024 रोजी अमोल देशमूख यांनी लेखापरीक्षण केले असता 22 जुलै ते 27 जुलै 2024 दरम्यान शाखेतून लोन व्यवहार झाल्याचे दिसून आले. त्यामध्ये 2 व्यवसायीकांना सोने तारण ठेवून त्यांना मोठी रक्कम दिल्याचे आढळून आले. परंतू आरोपींनी हेराफेरी करून नकली व बनावट सोन्याचे दागिने, आभूषणे तारण ठेवून कंपनीची फसवणूक करीत तब्बल 26,21,472 रुपयांचा अपहार केला आहे,अशी पोलिस तक्रार आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!