बुलढाणा ( हॅलो बुलढाणा) रविवारच्या आठवडी बाजारात मोबाइल चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. पोलिसांनी पहारा लावूनही चोरटे हाती लागत नसल्याचे दिसून येत आहे. आठवडी बाजारातून अनेकांचे मोबाइल चोरीला गेले. चोऱ्या एवढ्या वाढल्या की,जणु ‘आम्हाला पकडून दाखवा’ असे बुलढाणा पोलिसांना आव्हान दिले आहे.
रविवार… या दिवशी बुलढाणा शहर व परिसरातील असंख्य ग्रामस्थ व नागरिक खरेदी विक्री साठी गर्दी करीत असतात ..मात्र याच गर्दीचा फायदा भुरटे चोर घेत आहेत.. दार रविवारी असंख्य नागरिकाचे मोबाईल चोरी जात आहेत.. पोलिसांमध्ये या मोबाईल चोरीच्या असंख्य तक्रारी प्राप्त होत आहेत. त्याच धर्तीवर बुलढाणा शहर पोलीस ऍक्शन मोड वर आले असून साध्या वेषात गर्दीत पोलीस फिरत असून तसेच पोलिसा वाहानाच्या लाऊडस्पीकर वरून नागरिक व ग्रामस्थाना सुचणा देत आहेत.. हे वाहन रस्त्यावरून फिरत असून नागरिकांना सतर्क राहण्याची सूचना दिली जात आहे.