बुलढाणा (हॅलो बुलडाणा) बांगलादेशात हिंदू वरील अत्याचार टोकाला गेला असून, हिंदूंच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.असे चित्र असले तर संभाव्य परिस्थितीत सरकार आपले काम करेल आणि हिंदू समाज आपले काम करणार आहे, असा इशारा आमदार संजय कुटे यांनी दिला. याशिवाय साध्वी त्रिवेणी दीदी देशमुख,चैतन्यजी महाराज यांनी देखील बांगलादेश विरोधात आगपाखड केली आहे. बुलडाणा सकल हिंदू समाजाच्या वतीने आज आक्रोश मोर्चा काढण्यात आला.
सर्वप्रथम स्थानिक गर्दे वाचनालय येथे सकल हिंदू बंधू भगिनी यांनी एकत्रित येऊन आक्रोश मोर्चा भोंडे चौक, तहसील चौक, मार्गे संगम चौक, जयस्तंभ चौक, मार्गे मार्गक्रमण करत जिल्हाधिकारी कार्यालयावर हा आक्रोश मोर्चा धडकला. बांगलादेशात हिंदूवर अन्याय त्याच्यावर होत आहे. त्यामुळे भारतभर या घटनेच्या निषेधार्थ मोर्चे व आंदोलन करण्यात येत आहेत आज बुलढाणा शहरांमध्ये हिंदू राष्ट्र संघटनेतर्फे आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यामध्ये प्रामुख्याने आमदार संजय कुटे,आमदार आकाश फुंडकर, आमदार चैनसुख संचेती यांच्यासह असंख्य हिंदू बांधवांनी मोर्चात सहभाग नोंदवला व विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन देण्यात आले.
▪️मागण्यांवर दृष्टिक्षेप..
बांगलादेश सरकारला भारत सरकारतर्फे हिंदू अत्याचाराच्या विरुद्ध कठोर इशारा दिला जावा. मानवाधिकारवादी संघटनांनी हिंदू आणि अन्य अल्पसंख्यकांवरील हल्ल्यांची, अत्याचारांची दखल घेवून हा मुद्दा राष्ट्रीय,
आंतरराष्ट्रीय स्तरावर लावून धरावा. बांगलादेशातील हिंदूंच्या जिविताची आणि संपत्तीची रक्षा तसेच महिलांवरील अत्याचारांच्या घटनांना पायबंद घातला जावा,
यासाठी बांगलादेश सरकारने तातडीने पावले उचलावी.
इस्कॉनचे साधू चिन्मय कृष्ण दास यांची तुरुंगातून तत्काळ ससन्मान मुक्तता करण्यात यावी.हिंदू कलाकार, व्यावसायिक, उद्योगपती, खेळाडू, राजकीय नेते तसेच हिंदू मंदिरांना सुरक्षा पुरविली जावी.
बांगलादेशातील पाकिस्तानी जिहाद्यांच्या हस्तक्षेपाला पायबंद घालावा आदी मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहे.