बुलढाणा (हॅलो बुलडाणा) बांगलादेशातील हिंदूंवरील अन्याय अत्याचाराविरुद्ध निषेध नोंदविण्यासाठी 10 डिसेंबरला बुलढाण्यात ‘आक्रोश-न्याय मोर्चा काढण्यात येणार आहे.
बांगलादेशातील हिंदू आणि सर्व अल्पसंख्यांकावर जीहादी कट्टावाद्यांकडून हल्ले,खून,लुटमार,जाळपोळ,लूटमार,जाळपोळ आणि महिलांवर होणारे अत्याचार चिंताजनक असून या विरोधात शांततापूर्ण आंदोलने बांगलादेश सरकारकडून अन्यायकारकपणे दडपली जात आहेत.या शांततापूर्ण दिग्दर्शनांमध्ये हिंदूंची नेतृत्व करणारे इस्कॉन साधू चिन्मय, कृष्णादासजी यांना तुरुंगात पाठवणे हे देखील अन्यायकारक आहे.बांगलादेशातील हिंदू व इतर अल्पसंख्यांकावर होणारे अत्याचार त्वरित थांबवावेत व बांगलादेशाने इस्कॉनचे संन्यासी स्वामी चिन्मय कृष्ण दासजी यांची तात्काळ तुरुंगातून सुटका करावी,यासाठी सकल हिंदू समाज बुलढाणाच्या वतीने 10 डिसेंबरला आक्रोश -न्याय मोर्चाचे आयोजन केले आहे.हा मोर्चा दुपारी दोन वाजता गर्दी वाचनालय येथून निघणार आहे. ज्यांना मोर्चात सहभागी होता येत नसेल, त्यांनी हातावर काळीपट्टी बांधून दिवसभर निषेध नोंदवावा असेही आवाहन आयोजकांनी केले आहे