spot_img
spot_img

💥ब्रेकिंग! राजकीय खुन्नस .. सत्तेचा माज? तडीपार नोटीस मागे राजकीय राजकारण! – डॉ. ज्ञानेश्वर टाले यांना तडीपार होण्याची नोटीस!

मेहकर (हॅलो बुलडाणा) शेतकरी चळवळीतील रविकांत तुपकर यांचे जिवलग सहकारी, डॉ. ज्ञानेश्वरजी टाले यांना बुलडाणा व वाशिम जिल्ह्यातून तडीपार करण्याची नोटीस मेहकर पोलिसांकडून जारी करण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव आणि रविकांत तुपकर यांचे वैर सर्वश्रुत आहे.परंतु केंद्रीय आयुष मंत्री असे करू शकतात का हो? हा प्रश्न चर्चित आहे.

डॉ. ज्ञानेश्वर टाले हे मेहकर तालुक्यातील रविकांत तुपकरांचे अत्यंत जवळचे सहकारी आहेत. शेतकऱ्यांच्या चळवळीत ते अनेक वर्षांपासून ताकदीने काम करतात. तुपकरांच्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी त्यांनी मेहकर विधानसभा मतदारसंघात अतिशय ताकदीने प्रचाराची व नियोजनाची धुरा सांभाळली होती.प्रतापराव जाधव या विद्यमान खासदारांच्या तोडीस तोड मते मेहकर विधानसभेत पडली, हे त्यांच्या व सहकाऱ्यांच्या परिश्रमांचे फलित आहे. डॉ. टाले यांच्यावर चोरी, दरोड्यासारखे गुन्हे दाखल नसून केवळ चळवळीच्या पार्श्वभूमीवरील गुन्हे दाखल आहेत.अनेक वेळा खोटे गुन्हे सत्ताधाऱ्यांनी दाखल केले आहेत.त्यात अतिरेक बघा ऑक्टोबर महिन्यातील नोटीस त्यांना पोलिसांनी काल दिली आहे, जेणेकरून त्यांना बाजू मांडण्यास वेळ मिळायला नको. पण अशा कितीही नोटीसा दिल्या तरी आम्ही त्याला घाबरत नाही. तुम्ही आम्हाला तडीपार करा नाहीतर फासावर लटकवा,आमची सत्याची लढाई थांबणार नाही. महाराष्ट्राची पूर्ण संघटना व आम्ही डॉ.ज्ञानेश्वर टाले यांच्यासोबत खंबीरपणे उभे आहोत,अशी प्रतिक्रिया रविकांत तुपकर व त्यांच्या समर्थकांनी दिली आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!