spot_img
spot_img

💥आस्था! ‘लगीन देवाचं लागतं!’ – शिवपार्वतीच्या लग्न सोहळ्याने ईसोली दणाणली!

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) देवाधिदेव महादेव व माता पार्वती यांचा लग्नसोहळा ईसोली या छोट्याशा गावात मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्यात आला.अनेक वर्षापासून ही परंपरा ईसोली वासियांनी जपली आहे.

इसोली या छोट्याश्या गावात महादेव आणि पार्वती या देवांच्या लग्न सोहळ्याची रेलचेल पाहायला मिळाली. सकाळपासूनच वर व वधू कडील पाहुणे मंडळी या गावात सकाळपासूनच हजेरी लावत होती. वाजंत्री, मंगलाष्टके सारे काही एखाद्या खऱ्याखुऱ्या लग्नासारखे चित्र या ठिकाणी पाहायला मिळाले. हा लग्नसोहळा साजरा करण्याची परंपरा आहे. येथील विठ्ठल संस्थानमध्ये आयोजित अखंड हरिनाम सप्ताहात तिसऱ्या दिवशी शिवपार्वतीचा लग्न सोहळा थाटात पार पडला. रामायणाचार्य हभप वेणूताई पाटील यांच्या वाणीतील मंगलाष्टकांनी शोभा आणली. पार्वतीच्या भूमिकेतील तन्मय येवले याने सर्वांचे लक्ष वेधले. शंकराची भूमिका अर्णव याने साकारली होती.
अखंड हरिनाम सप्ताहाला २ डिसेंबरपासून सुरुवात झाली. सकाळी ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी रामायण आणि संध्याकाळी हरिनाम कीर्तन असा दिनक्रम असणार आहे. सात दिवस गावात अध्यात्मिक वातावरण राहणार आहे. गोविंद येवले व सौ.अनिता येवले यांनी रामायणाचार्य हभप वेणूताई पाटील रिसोडकर यांचा सत्कार करुन आशीर्वाद घेतले. वेणूताईच्या वाणीतून रामायण ऐकले. प्रत्येकाने प्रभू श्रीराम यांचे विचार आचरणात आणावे, असे आवाहन गोविंद येवले यांनी केले. संगीत रामायणात मंजूळ गायिका ज्ञानेश्वरीताई पाटील, हभप ज्ञानेश्वर महाराज गाडेकर, हभप देवानंद महाराज शेळके, हभप शेषराव महाराज शेळके, उत्कृष्ट मृदुंग वादक हभप अमोल महाराज धनलोभे यांनी विशेष साथ दिली. रामायण ऐकण्यासाठी पुरुष व महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!