spot_img
spot_img

जोहर नगरात अस्वच्छतेचा कहर! -नगरपालिका स्वच्छता करण्यात अकार्यक्षम

बुलढाणा इसरार देशमुख (हॅलो बुलढाणा) सध्या जोहर नगर भागातील नागरीकांना मुलभुत सोयी सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. येथील ओपनपेस कचऱ्याचा ढिगारा झाला असून, नागरिकांच्या आरोग्यासाठी धोक्याची घंटा ठरत आहे. या ओपनपेसची स्वच्छता करून वॉल कंपाऊंड करून येथे वृक्षारोपण करण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे.

याबाबत प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,ईकबाल चौक ते उर्दु हायस्कुलकडे जाणाऱ्या मार्गाच्या डावीकडील भाग जोहर नगर म्हणून ओळखले जाते. या भागात मुलभुत सुविधांचा अभाव आहे. या भागातील सै. बिराम डोंगरे यांच्या घराच्या मागील
भागात नगर पालीकेचा एकमात्र ( ओपनस्पेस) खुलीजागा है कचऱ्याचे ठिकाण झाले आहे.
परिसरातील नाल्यांची सफाई १ महिन्यात १ वेळा अर्धवट केली जात आहे व ओपनस्पेसमध्ये कचरा, नालीत घाण तुंबली जात आहे.न.पा.अधिकाऱ्यांना वारंवार तक्रार केल्यावर त्यांच्या म्हणण्यानुसार ठेकेदार
आमचे ऐकत नाही तर तुमचे काय ऐकनार असे सांगण्यात येत आहे. न. पा. कर्मचारी
तोंडी म्हणतात कि, न.पा. बुलडाणाकडे घाण उचलण्यासाठी जे. सी. बी. व ट्रक्टर नाही.मुख्याधिकारी साहेब, यांची प्रत्येक्ष भेट जोहर नगरच्या ओपन स्पेसला करून दिल्यानंतरही आजपर्यंत जोहर नगर भागातील कचरा, नाल्याची घाण, उचलण्यात आलेली नाही. न.पा. चे कर्मचारी मुख्याधिकारी साहेबांचे ऐकत नाही तर मा. जिल्हाधिकारी साहेबांनी
न्याय मिळवुन दयावा.अशी मागणी जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!