बुलढाणा (हॅलो बुलडाणा) ट्रक म्हणा की रुग्णवाहिका ही वाहने भारधाव असतात. बिबी ते दुसरबीड मार्गावर रुग्णवाहिका व ट्रकचा भीषण अपघात होऊन रुग्णवाहिका चालक ठार तर एक जण जखमी झाल्याची दुर्दैवी बातमी आहे.
मंगळवारी रात्री 9 वाजता बिबी दुसरबीड मार्गावरील अग्रवाल पेट्रोल पंपाच्या जवळ ट्रक व रुग्णवाहिका समोरासमोर धडकली. झालेल्या अपघातात रुग्णवाहिका चालक अक्षय उकंडा आडे रा. (आईचा तांडा) किनगाव जट्टू ता.लोणार जि. बुलढाणा जागीच ठार झाला आहे.वाहक राजेश्वर वाकळे वय वर्ष 30 रा वाशी मुंबई हा गंभीर रित्या जखमी झाला. ही रुग्णवाहिका बिबी कडून दुसरबीडकडे जात होती. घटनेची माहिती मिळताच पोलीस यंत्रणा घटनास्थळावर पोहोचली.या अपघाता प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.














