spot_img
spot_img

बुलढाण्याच्या भर चौकातून दुचाकी लंपास!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा)सकाळी बातम्या बघताना किंवा वाचताना एखाद-दुसरी वाहन चोरीची बातमी आपल्या डोळ्यांना दिसत असते. त्यामध्ये ते वाहन खासकरून दुचाकी असण्याचे प्रमाण अधिक असते. ही चोरी अगदी भल्यामोठ्या शहरांपासून ते अगदी एखाद्या लहानश्या गावात रात्री किंवा अगदी दिवसाढवळ्या होत असतात. याकडे मात्र पोलीस दुर्लक्षित दिसून येत आहेत. बुलढाणा येथील मलकापूर रोडवर असलेल्या आणि आमदारांच्या कार्याला समोरील धंदूकिया हॉटेल मधील कारागिराची दुचाकी रात्री अज्ञात चोरट्याने लंपास केली. या संदर्भात पोलिसात तक्रार दाखल तक्रार देणारा असीमुद्दिन काझी हा इकबाल नगर मध्ये राहतो. तो मलकापूर रोडवरील धंदुकीया हॉटेलमध्ये कारागीर म्हणून काम पाहतो. हॉटेलमध्ये काम करीत असताना रात्री गाडी हॉटेलच्या बाहेर उभी केली होती. दरम्यान अज्ञात आरोपीने गाडी लंपास केली. समोरच आमदार संजय गायकवाड यांचे मातोश्री कार्यालय आहे. परंतु येते सुरक्षा नसल्याचे स्पष्ट होत असून पोलीस पेट्रोलिंग करतात की नाही ?असा प्रश्न निर्माण झाला आहे. एस पी सुनील कडासने यांनी याकडे लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!