spot_img
spot_img

“सामाजिक, बौद्धिक झगमगाट!” -‘दै.जनसंचलन’ च्या ‘दिपोत्सव-2024’ दिवाळी अंकाचे शानदार लोकार्पण! – मान्यवरांचे गौरवोद्गार… वाचकांची पसंती!

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) गेल्या काही वर्षांपासून ‘दै.जनसंचलने’ दिवाळी अंकाचा दर्जा,लौकिक आणि सातत्य कायम ठेवले! ऐन दिवाळीत आलेल्या विधानसभा निवडणुकीच्या धामधूमीत दैनिक जनसंचलनचा ‘दीपोत्सव 2024’ काहीसा विलंबनाने प्रकाशित झालाय. अंक हातात पडून अवलोकन करताच दिग्गज मान्यवरांनी सामाजिक जागर, श्रमातून, कौशल्यातून, बौद्धिक- सामाजिक मंथनातून यंदाचा दीपोत्सव साकारला असल्याची प्रतिक्रिया प्रेरक म्हणावी लागेल!

बुलढाणा अर्बन बँकेचे सर्वेसर्वा राधेश्यामजी चांडक,माजी नगराध्यक्ष पुष्पाताई चांडक,बुलढाणा अर्बनचे जनरल मॅनेजर डॉ.सुकेश झंवर (gm), सहकार विद्या मंदिरच्या संचालिका कोमलताई झंवर, राजर्षी शाहू बँकेचे सर्वेसर्वा तथा अभीता लॅन्डचे सर्वेसर्वा तथा उद्योजक सुनीलभाऊ शेळके यांच्या हस्ते या दिवाळी अंकाचे थाटात लोकार्पण झाले.
प्रत्येक अंक आपली अशी स्वतंत्र ओळख सिद्ध करण्याचा प्रयत्न करत असतो. ‘दैनिक जनसंचलन’चे संपादक जितेंद्र कायस्थ यांनी आपल्या अंकाचे वेगळेपण साकारण्यासाठी यंदा राजकीय, सामाजिक, वैचारिक,ललित, मनोरंजनात्मक असे बहुविध साहित्य अनेक लेखकांमार्फत प्रकाशित केलेत. ‘न्यायाचा’ आणि ‘सत्याचा’ हातात हात धरून चालणारा ‘दैनिक जनसंचलन’ वाटचाल करीत असून,यंदाचा ‘दीपोत्सव 2024’ हा दिवाळी अंक सुद्धा पत्रविश्वात वैभवशाली ठरणारा असल्याची वाचकांमधून प्रतिक्रिया व्यक्त होतेय!

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!