spot_img
spot_img

💥ब्रेकिंग! धाड येथे दंगलसदृश्य परिस्थिती! दगडफेक व जाळपोळ ; दोन गटात राडा! टिपू सुलतान यांच्या मिरवणुकी दरम्यान फटाके उडवण्यावरून पेटली दंगल?

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) धाड येथे काही वेळापूर्वी दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून अद्यापही या दंगलीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस प्रशासन व दोन्ही गटांतील काही नागरिक प्रयत्न करत आहे.टिपू सुलतान यांच्या मिरवणुकी दरम्यान फटाके उडवण्यावरून दोन गटांमध्ये वाद पेटला असून दगडफेक व जाळपोळ झाली आहे.

अलीकडे क्षूल्लक कारणावरून मारहाणीच्या घटना घडत आहेत.परंतु धाड येथे टिपू सुलतान यांची मिरवणूक काढताना फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली आणि वाद उफाळून आला.दोन गट आमने-सामने ठाकले असून,प्रचंड राडा झाला.दोन्ही गटात दगडफेक करण्यात आली.वाहनांची जाळपोळ देखील करण्यात आली आहे. ही दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असताना पोलीस दलांचा घटनास्थळी पोहोचले असून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा पुरेपूर प्रयत्न सध्या सुरू आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!