बुलढाणा (हॅलो बुलढाणा) लोकसभा निवडणुकीत चौकार मारलेल्या प्रतापराव जाधव यांचा बुलढाण्यात सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त भव्य नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यासाठी चर्चात्मक बैठकीचे आयोजन देखील करण्यात आले असून
आज २२ जून रोजी सायंकाळी ५ वाजता “विसावा” शासकीय विश्रामगृह बुलढाणा येथे बैठक होणार आहे.
निवडणूक झाली, राजकारण संपले.. केंद्रीय मंत्रीपदी नियुक्ती झाल्यानंतर ना. प्रतापराव जाधव यांनीही तीच भूमिका घेऊन चला सोबतीने काम करूया..अशी साद घातली असून त्याला प्रतिसाद देण्यासाठी, आपण सर्वांनीही तीच उदार भूमिका घेणे महत्त्वाची आहे ! भारत सरकारचे केंद्रीय मंत्रीपद, आयुष्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाचा स्वतंत्र प्रभार तर आरोग्य मंत्रालयाचे राज्यमंत्रीपद.. एवढी महत्त्वाची व थेट पीएमओ.शी संबंधित असणारी मंत्रालये ना. प्रतापराव जाधव यांना मिळालीत.
केंद्रीय मंत्रीपदी विराजमान झालेले मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्याचे प्रतापराव जाधव हे पहिले भूमिपुत्र..यापूर्वी बुलढाण्याचे खासदार म्हणून निवडून आलेले मुकुल वासनिक व आनंदराव अडसूळ यांनाही केंद्रीय मंत्रीपदे मिळाली होती, पण ते बुलढाणा जिल्ह्याचे रहिवासी नव्हते.. त्यामुळे जिल्ह्याचे भूमिपुत्र म्हणून प्रतापरावांना मिळालेला हा सन्मान निश्चितच आपणा सर्वांसाठी मोठा आहे.याच अनुषंगाने.. राजकारणविरहित, पक्षविरहित, संघटनाविरहित असा त्यांचा बुलढाणा येथे भव्य नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यासाठी चर्चात्मक बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या बैठकीस आपण आवर्जून उपस्थित रहावे अशी विनंती करण्यात आली आहे.