spot_img
spot_img

रक्तदान चळवळ घराघरांत पोहचवू- संदीप शेळके रक्तदान शिबिरात १०३ दात्यांचे रक्तदान ! -शिवसेना (उबाठा) व राजर्षी शाहू सोशल फाऊंडेशनचे आयोजन

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) रक्ताचा एक थेंब रुग्णाचे प्राण वाचवू शकतो. त्यामुळे रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. शिवसेना (उबाठा) पक्ष आणि राजर्षी शाहू सोशल फाऊंडेशनच्या माध्यमातून रक्तदान चळवळ घराघरांत पोहचवू असे प्रतिपादन शिवसेनेचे (उबाठा) जिल्हा समन्वयक संदीप शेळके यांनी केले.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष तसेच राजर्षी शाहू सोशल फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा सामान्य रुग्णालयात ३० नोव्हेंबर रोजी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे रुग्णालय प्रशासनाकडून रक्तदान करण्याबाबत आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत राजर्षी शाहू सोशल फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा शिवसेना (उबाठा) पक्षाचे जिल्हा समन्वयक संदीप शेळके यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले. देऊळघाट येथील बाळू भराड यांनी ७१ व्या वेळी रक्तदान करुन समाजासमोर आदर्श उभा केला.

रक्तदान शिबिरप्रसंगी राजर्षी शाहू परिवाराचे संस्थापक भाऊसाहेब शेळके, शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, शिवसेना (उबाठा) पक्षनेत्या जयश्रीताई शेळके, जिल्हा संघटक डी. एस. लहाने, काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस सुनील सपकाळ, शिवसेना (उबाठा) तालुकाध्यक्ष लखन गाडेकर, राजर्षी शाहू मल्टिस्टेटच्या अध्यक्षा मालतीताई शेळके, आशिष खरात, गणेश जाधव, डोंगरखंडाळाचे उपसरपंच श्याम पाटील सावळे, डॉ. खर्चे, डॉ. घोलप, डॉ. प्राची तायडे, डॉ. रेश्मा खरात व शिवसेना (उबाठा) पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!