बुलढाणा (हॅलो बुलडाणा) बोगस दिव्यांग प्रमाणपत्र घेऊन प्रत्येक क्षेत्रात कर्मचारी आपला उल्लू सरळ करत आहेत.हे पाप मात्र जिल्हा सामान्य रुग्णालयातील दिव्यांग बोर्ड करत असल्याचा आरोप खुलेआम केला जात आहे. जिल्ह्यात ‘पूजा खेडकर’ आहेत तरी किती?
असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला असून,याकडे लोकप्रतिनिधीसह वरिष्ठ अधिकारी डुंकूनही पाहायला तयार नाहीत. खरी तपासणी प्रमाणपत्राची नव्हे तर दिव्यांग कर्मचाऱ्यांची व्हावी आणि त्यानंतर यंत्रणेतील अधिकाऱ्यांना सस्पेंड करण्यात येण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
शिक्षकांची उदाहरण घेऊया! नोकरीला लागताना दिव्यांग कोट्यातून भरती झालेले कमी आहेत.परंतु बोगस दिव्यांग शिक्षक अधिक पाहायला मिळतात. बदली प्रमोशन, निवडणूक कार्यातून सवलती, ड्युटी मध्ये वेळेत शिथिलता, इन्कम टॅक्स मध्ये सूट, इत्यादी साठी बुलढाणा, मेहकर,चिखली व अन्य तालुक्यातील अनेक धड धाकट शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी बाबू यांनी बुलढाणा सरकारी रुग्णालयातून पैसे मोजून बोगस प्रमाणपत्र घेऊन लाभ लाटण्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे इतर शिक्षकांवर अन्याय होतेय. यातील काही प्रमोशन घेऊन निवृत्त सुद्धा झालेत. मागील वर्षामध्ये लोकांनी ऑनड्युटी कुठलीही सुट्टी न घेता काहींनी दबाव तंत्र, व आपले कू-कौशल्य पणाला लावून शाळेवर हजर राहून बुलढाणा येथील तपासणी केल्याचे दाखवून प्रमाणपत्र मिळविले. त्यांना प्रमाणपत्र मिळाल्याचे तारीख -वर्ष व त्या वर्षातील उपस्थिती हजेरी मस्टर माहिती अधिकाराने बोलावून शहानिशा केल्यास अनेक पुजा खेडकर आढळून येतील. खरोखर दिव्यांग असलेल्या बांधवांना लोकांना मात्र अनेक वेळा बुलढाणा सरकारी रुग्णालयाच्या अनेक वाऱ्या करून सुद्धा वर्षानुवर्ष प्रमाणपत्र मिळत नसल्याची खंत आहे. मात्र पैसे दिले की बोगस दिव्यांग प्रमाणपत्र मिळतात.त्यामुळे तपासणी प्रमाणपत्राची नाही तर तपासणी दिव्यांग कर्मचाऱ्यांची व्हायला पाहिजे. जिल्हा परिषद या सर्व बाबींना दोषी आहे असाही आरोप केला जात आहे.जिल्हा परिषदेने अर्थपूर्ण नियोजन करून ही बाब टाळाल्याचे म्हटले जात आहे.
“दिव्यांग / अस्तिव्यंग बोगस प्रमाणपत्र प्रकरणातील संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्याची चल अचल संपत्तीची चौकशी करण्याची तक्रारकर्त्यांची मागणी”
क्रमशः