spot_img
spot_img

💥पॉलिटिक्स! दोन वेळा विजय तर तीन निवडणूकीत निसटता पराभव ; संघर्ष जारी रहेगाचे दिले संकेत ! -सलग पाच विधानसभा लढूनही राहुलभाऊंची लोकप्रियता कायमचं…!

चिखली (हॅलो बुलडाणा) राजकारणात एखादी भूमिका घेऊन ती शेवटापर्यंत नेण्यासाठी सातत्यपूर्ण आणि दीर्घकालीन संघर्ष करावा लागत असतो. मात्र अनेक प्रस्थापित नेत्यांनी रातोरात पक्ष बदलून विचारधारेला धुळीस मिळवल्याचे अनेक उदाहारणे महाराष्ट्राच्या जनतेने कधीनव्हे तर गत दहा वर्षात अनुभवली. मात्र अशा भरकटलेल्या वातावरणात चिखली विधानसभा मतदारसंघात १९९० पासून काँग्रेसच्या विचारसरणीला अधिष्ठान मानून राहुल भाऊ बोंद्रे करत असलेला संघर्ष दखल पात्रचं ठरतो. राहुल भाऊ बोंद्रे यांना २००४ ला १०८४ मताने पराभवाचा सामना करावा लागला. २००९ मध्ये २७९१६ मताने तर २०१४ ला मोदी लाटेतही १४०६१ मताने त्यांनी गुलाल उधळला. २०१९ च्या विधानसभा निवडणूकीत ६८१० एवढ्या अल्प मताने तर पुढे २०२४ ला ३८१० मताने राहुल बोंद्रे यांना निसटत्या पराभवाचा सामना करावा लागला. मात्र या ३५ वर्षाच्या दीर्घ काळातही राहुल भाऊ बोंद्रे यांची लोकप्रियता दिवसेगणिक अधिक वाढत असल्याचे आशादायी चित्र आहे. पराभवानंतरही संघर्ष जारी रहेगाचे त्यांनी दिलेले संकेतही अनेक कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना उभारी देवून जात आहे, हे विशेष..!

जिल्ह्याची राजकीय राजधानी असलेल्या चिखली विधानसभा मतदारसंघात रेखाताई खेडेकर यांनी घालून दिलेला शांत व संयमी राजकारणाचा पायंडा २००९ पासून राहुल भाऊ बोंद्रे यांनी कायम राखला. प्रचंड जनसंपर्क आणि सतत कार्यमग्न असणे या त्यांच्या जमेच्या बाजू. चिखली मतदारसंघातले असे कुठले गाव नसेल की त्या गावातील नागरिक राहुल भाऊंना ओळखत नसेल. प्रत्येकाच्या सुख- दुखात सहभागी होवून त्यांना आपलेसे करणे हा तर राहुल भाऊंचा स्थायीभाव.. त्यामुळे अगदी बोटाच्या कांड्यावर मोजण्याइतपत त्यांच्या समाजाचे मतदान असतांनाही त्यांनी समाजाने बहुसंख्येने असणाऱ्या प्रतिस्पर्धी उमेदवारांना धोबीपछाड केले. या संघर्षात त्यांना तीनही निवडणूकीत अगदी 6 हजारांपेक्षा कमी मताधिक्याने पराभवाचा सामना करावा लागला. मुळात आकड्यांच्या गणितामध्ये हे पराभव असतील मात्र राजकीय जाणकार त्यांच्या या हरण्याला पराभव मानत नाही. तर अल्पसंख्याक समाजाचा माणूस मतदारसंघात सर्व जाती- धर्माच्या लोकांची मते खेचण्यात कमालीचा यशस्वी होत असल्याचा चढता आलेख मांडता. यावरुन राहुल भाऊंच्या लोकप्रियता कमालीची वाढत असल्याचे सिद्ध होते.

▪️राहुल गांधींची सभा झाली असती तर राहुल भाऊंनी गुलाल उधळला असता..

समाजाची 200 मते नसलेला माणूस सलग पाचवी निवडणुक लढविण्याची हिंमत करतो व त्यात लाखा पेक्षा जास्त मते घेतो, हा निकाल त्यांच्या लोकप्रियतेचा अंदाज देऊन जातो. देशात सत्ता नाही, राज्यात सत्ता नाही, जिल्ह्यातील सर्व संस्था, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद शासकीय प्रशासकाच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांच्या हातामध्ये. सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांचीच कामे होत होती.विरोधी पक्षांची कामे तर नाहीच पण कामे उलट अडविली जात होती.
हजारो कोटी रुपयांच्या विकासाचे खोटे चित्र उभे करून काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना ठेकेदारीचे आमिष दाखवून फोडण्याचा प्रयत्न केला जात होता. राहुल भाऊंच्या सर्व संस्थांच्या मागे चौकशीचा ससेमीरा लावल्या गेला. संस्थांच्या व पतसंस्थेच्या नवीन परवानग्या थांबवण्यात आल्या. ग्रामपंचायत, पंचायत समिती, नझुल व इतर सरकारी संस्थांच्या माध्यमातून या संस्थांवर कोट्यावधी रुपयाचे खोटे दंड आकारण्याचे पद्धतशीर नियोजन करण्यात आले. विधानसभेमध्ये या संस्थांच्या विरोधात लक्षवेधी उपस्थित करण्यात आल्या. राहुल भाऊंच्या आणि त्यांच्या कुटुंबाच्या व्यक्तिगत मालमत्तांवर आरक्षण टाकण्यात आली. तब्बल ७२ कोटी रुपयांची वसुली त्यांच्या व्यक्तिगत मालमत्ता मधून करण्याच्या संदर्भातली कार्यवाही सुरू केल्या गेली. तरी देखील राहुल भाऊ डगमगले नाही,थांबले नाहीत झुकले नाहीत. संघर्ष करत राहिले. अशा परिस्थितीत देशाचे विरोधी पक्ष नेते खा. राहुल गांधी यांची सभा झाली असती तर राहुल भाऊ बोंद्रे यांनी चिखली मतदारसंघात गुलाल उधळला असता, मात्र तांत्रिक कारणामुळे राहुल गांधी येवू न शकल्यामुळे विरोधकांनी फेक नॅरेटिव्ह सेट करुन राहुल भाऊंच्या विरोधात अप्रचार केला. परिणामी याचा फटका राहुल बोंद्रे यांना बसल्याचे बोलले जात आहे.

▪️संघर्ष जारी रहेगा : राहुल भाऊ बोंद्रे

“बढे चलो” ही श्रीनाथ सिंह यांची कविता माझ्या वाचनात आली. माझ्या मनामध्ये असलेले विचार या कवितेमध्ये प्रतिबिंबित झालेले मला दिसले आणि म्हणून मला ती कविता खूप भावली. मी पक्ष बदल करणार अशी चर्चा चिखली भाजपाच्या कार्यालयातून जाणीवपूर्वक पसरवण्यात येत आहे. ईव्हीएम व एटीएम यांच्यामुळे महाराष्ट्रातल्या निवडणुका संशयाच्या भोवऱ्यात आहेत, असे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार राहुल बोंद्रे म्हणाले. पुर्नमतमोजणीचा चिखली मतदारसंघातील आमचा अर्ज नामंजूर करण्यात आला. यासंदर्भात योग्य ती न्यायालयीन लढाई महाविकास आघाडीच्या वतीने आम्ही लढत राहू, संघर्ष माझ्या रक्तात असल्याचेही राहुल भाऊ बोंद्रे यांनी सांगितले.

▪️राहुल भाऊ यांनी पोस्ट केलेली कविता होतेय प्रचंड व्हायरल !

राहुल भाऊ बोंद्रे यांच्या भय आणि भ्रष्टाचार मुक्ती विरुध्दचा पराभव अनेकांच्या जिव्हारी लागला असल्याचे चिखली विधानसभा मतदारसंघातील चित्र आहे. १ लाख ६ हजार १११ मतदारांनी ठेवलेल्या विश्वासाला नतमस्तक होत राहुल भाऊ बोंद्रे यांनी बढ़े चलो ही कविता समाजमाध्यमांवर पोस्ट केली. राहुल भाऊ यांनी पोस्ट केलेली कविता प्रचंड व्हायरल होत असून कार्यकर्ते यामाध्यमातून एकमेकांना दिलासा देत असल्याचे पाहायला मिळत आहे.

▪️बढे चलो..!
फूल बिछे हों या कांटे हों, राह न अपनी छोड़ो तुम । चाहे जो विपदायें आयें, मुख को जरा न मोड़ो तुम। साथ रहें या रहें न साथी, हिम्मत मगर न छोड़ो तुम। नहीं कृपा की भिक्छा मांगो, कर न दीन बन जोड़ो तुम। बस ईश्वर पर रखो भरोसा, पाठ प्रेम का पढ़े चलो। जब तक जान बनी हो तन में, तब तक आगे बढे चलो !

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!