spot_img
spot_img

केळवद मारहाणीने हादरले!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) चिखली पोलीस स्टेशन अंतर्गत अनेक गुन्हेगारीच्या घटना घडत आहे. शांतप्रिय गाव असलेल्या केळवद येथे नुकतीच हाणामाराची घटना घडली. एकामेकांना चाप्टा बुक्क्यांनी मारहाण केलेला व्हिडिओ व्हायरल झाला आहे. तंटामुक्ती अध्यक्ष किंवा पोलीस पाटील या प्रकरणाकडे फिरकले नाहीत.

मंगेश महादु गवई यांनी पोलीस स्टेशनला रिपोर्ट दिला की, 18/06/2024 रोजी संध्याकाळी 04:00 वाजे दरम्यान मी आणी माझा मीत्र सोमेश मधुकर माहोरे असे आम्ही दोघे मोटारसायकलने पेट्रोल भरणेसाठी केळवद
बस स्टॅण्डवर आलो असता, माझा मित्र सोमेश माहोरे याचे माझेकडे उधार घेतलेले पाचशे रुपये मागितले असता मी त्याला शिवी दिली. दरम्यान केळवद बस स्टॅण्डवर हजर असलेले संदानद
गायकवाड, विजु गायकवाड, संतोष गायकवाड, गोपाल कालेकर, बालु गायकवाड व इतर लोकांनी मला आवाज देवुन आम्हांला शिवीगाळ करतो का, असे म्हणुन वरिल पाचही मराठा समाजाचे लोकांनी मला पायातील बुट व चप्पलांनी मारहान करुन तुम्ही बौध्द लोकं जास्त माजले असे जातीवाचक अश्लील शिवीगाळ केली. त्यावेळी बस स्टँडवर
गावातील बरेच लोक हजर होते मला मारहाण केल्यानंतर मराठा समाजाचे लोक निघुन गेल्यावर
माझा मित्र सोमेश माहोरे याने मला गाडीवर बसुन घरी घेवुन गेला मला मुक्कामार असल्याने व
माझी मानसीक स्थीती ठिक नसल्याने मी दोन दिवस घरा बाहेर पडलो नाही आज मला बरे वाटत असल्याने व मनस्थीती ठिक असल्याने मी माझी आई व मित्रा सोबत पोलीस स्टेशन ला रिपोर्ट देण्यास आलो.मला गावातील मराठा समाजाचे संदानंद गायकवाड, विजु गायकवाड, संतोष गायकवाड, गोपाल बालेकर, बालु गायकवाड यांनी मला पायातील बुट व चप्पलांनी मारहाण केली. असे रिपोर्ट मध्ये मंगेश याने म्हटले आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!