spot_img
spot_img

-राजकीय बुक्कीत टेंगूळ येण्याची प्रशासनाला भिती? -ग्रामपंचायत हद्दीत बेकायदा शुभेच्छा फलक !

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) विधानसभेच्या निवडणुकीत विजयी उमेदवारांना शुभेच्छा देणारे फलक शहरासह जिल्ह्यात झळकताहेत.परंतु ग्रामपंचायतींना अधिकार नसताना त्यांच्या हद्दीत जाहीरात फलक,होर्डिंग लावण्यात आले आहे. उच्च न्यायालयाचा आदेश असूनही राजकीय दबावापोटी त्यांचावर कारवाई होत नसल्याचे दिसून येत आहे.

विधानसभा निवडणुकीत
उमेदवार विजयी झाले असल्यामुळे याचा आनंद व्यक्त करण्यासाठी राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात जाहिरात फलक लावण्यात आले आहेत. नवनिर्वाचित आमदारांना विजयाच्या शुभेच्छा देण्यासाठी हे जाहिरात फलक उभारण्यात आले आहेत.विशेष म्हणजे शहरात कोणत्याही प्रकारचे बेकायदा फलक लावू नये, असे उच्च न्यायालयाचे आदेश आहेत. त्यामुळे अनधिकृत फलक लावल्यास कारवाई केली जाईल, असा इशारा यंत्रणेने दिलेला आहे. मात्र याकडे दुर्लक्ष करत चौकांमध्ये नवनिर्वाचित आमदारांचे अभिनंदन करणारे फलक लावून गाव शहर विद्रुप करण्यात आले आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या फलकांवर कारवाई करण्यास पालिका व ग्रामपंचायत विभाग दुर्लक्ष करत आहे. हे फलक उभारण्यासाठी लावण्यात आलेले सांगाडे धोकादायक झाल्याने अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. बेकायदा फलकांंबाबत न्यायालयाने स्पष्ट आदेश दिलेले असतानाही शहरात व गावात चौकाचौकांत अनधिकृत फलक लावण्यात आले आहेत.याबाबत पालिका व ग्रामपंचायतची केवळ बघ्याची भूमिका दिसून येत आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!