बुलढाणा (हॅलो बुलडाणा) शिक्षक म्हणा की डॉक्टर.. किंवा असोत वकील प्रत्येक क्षेत्रातील व्यक्तींना आमदार संजय गायकवाड निवडून आल्याचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.या आनंदात भर घातली ती येथील न्यायालयातील ॲड. दिनोदे यांनी! हा आनंद त्यांनी पेढे वाटून न्यायालयात साजरा केलाय.
शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड सलग दुसऱ्यांदा निवडून आलेत. परंतु यंदाची निवडणूक जिंकण्यासाठी त्यांना मोठा संघर्ष करावा लागला. त्यांना महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री शेळके यांनी तुल्यबळ लढत दिली.परंतु हार मानणारे संजय गायकवाड नाहीतच! त्यांनी अखेरच्या दोन ते तीन फेरीमध्ये अत्यल्प का होईना 841 मतांनी विजय खेचून आणला.हा विजय त्यांनी कार्यकर्त्यांना समर्पित केला आहे.प्रत्येक क्षेत्रात गायकवाड यांची विकास कामे असल्यामुळे आता या विजयाचा आनंद साजरा होत आहे.दरम्यान न्यायालयात देखील गायकवाड यांनी विकास कामे केल्याने त्यांच्या चाहत्यांनी विशेष म्हणजे ॲड.अजय दिनोदे यांनी हा आनंद आपल्या सहकाऱ्यांसोबत पेढे वाटून साजरा केला आहे.