बुलढाणा (हॅलो बुलढाणा) निष्ठावंत शहरप्रमुख गजेंद्र दांदडे यांच्यावर सोपविण्यात आलेली बुथनीहाय जबाबदारी त्यांनी योग्य रीतीने पार पाडली.आमदार संजय गायकवाड यांना त्यांनी बुलढाणा शहरातील सर्वाधिक मतदानाची लीड दिली आहे.
आमदार संजय गायकवाड यांचा 841 मतांनी म्हणजे निसटता विजय झाला. परंतु त्यांनी अटीतटीच्या लढतीत विजय खेचून आणला. त्यांचा विजय झाला. आमदार संजय गायकवाड यांनी आपल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना बुथनिहाय जबाबदारी सोपविली. त्यामधला निष्ठावंत कार्यकर्ता म्हणजे बुलढाणा शहरातील गजेंद्र दांदडे यांची ओळख आहे. त्यांच्याकडे बुथ क्रमांक 178,179,180 यावर गजेंद्र दांदडे लक्ष ठेवून होते. बुलढाणा शहरांमधून शहराध्यक्ष गजेंद्र दांदडे यांनी बुथ क्रमांक 178 वर 529 मतदान हे आमदार संजय भाऊ गायकवाड यांच्यासाठी खेचून आणले आहे. बुलढाणा शहरांमध्ये असे मोठे मतदान कुठेच भेटले नाही. त्यामुळे शिवसेना शहराध्यक्ष गजेंद्र दांदडे यांच्या नावाची चर्चा ही संपूर्ण शहरात होत आहे.
प्रभाग क्रमांक 2,3,4 मध्ये 2019 मध्ये अवघी 435 मतदान हे फक्त धनुष्यबणला झाले होते मात्र 2024 मध्ये बुथ क्रमांक 162 ते 177 मध्ये शिवसेनेला म्हणजेच धनुष्यबाणाला 1926 मतदान झालेले आहे हे मतदान मुस्लिम बहुल भागात मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे
शहर प्रमुख गजेंद्र दांदडे सह सर्व मुस्लिम बांधवांनी एकत्र मेहनत घेतली आहे त्यांच्या या मेहनतीमुळे मोठ्या प्रमाणात 2024 मध्ये मतदान झाले आहे