बुलढाणा (हॅलो बुलडाणा) चिखली विधानसभा मतदारसंघाच्या भाजपाच्या विजयी उमेदवार श्वेताताई महाले या लाडक्या बहिणीसाठी हिंदुत्वाच्या मतांचे विभाजन होऊ नये म्हणून मी थांबलो आणि श्वेता ताई महाले यांचा विजय झालाय हा विजय खऱ्या अर्थाने हिंदुत्वाचा व धर्माचा विजय असल्याचे कट्टर हिंदुत्ववादी म्हणून ओळख असलेले विजय मारुती पवार म्हणाले आहेत.त्यांनी आ.महाले यांच्या विजयाचे खरे शिल्पकार ना.नितीन गडकरी असल्याचे म्हटले आहे.
यंदाची निवडणूक 2019 च्या किंवा त्याआधीच्या निवडणुकीच्या तुलनेत अनेक अंगांनी वेगळी होती. या निवडणुकीत उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, शरद पवार, अजित पवार यांचं राजकीय भविष्यही दावणीला होतं. महायुतीनं राज्यभर हिंदुत्वाचा मुद्दा जोर धरून चालवला.‘बटेंगे तो कटेंगे’, ‘एक है तो सेफ है’चे नारे प्रचारसभेतून गाजले. मतदारसंघांवर याचा परिणाम दिसून आला.उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या सभेत ‘कटेंगे तो बटेंगे’ हा नारा दिला होता. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक है तो सेफ है’चा नारा दिला. या घोषणांचा वापर करत भाजप नेत्यांनीसुद्धा हिंदू मतदारांना एकत्र येण्याचं आवाहन केलं.दरम्यान चिखलीत याचा सकारात्मक परिणाम दिसून आला. चिखलीतून कट्टर हिंदुत्ववादी विजय पवार निवडणूक लढण्यास इच्छुक होते.मात्र ना नितीन गडकरी यांनी त्यांना थांबविले आणि श्वेताताई महाले यांच्यासाठी प्रखर हिंदुत्वाचा मुद्दा पुढे रेटण्याचे आवाहन केले होते.दरम्यान श्वेताताई महाले विजयी झाले असून हा विजय खऱ्या अर्थाने हिंदुत्वाचा व धर्माचा विजय असल्याचे आणि या विजयाचे खरे शिल्पकार ना. नितीन गडकरी असल्याचे विजय पवार म्हणाले .