बुलढाणा (हॅलो बुलढाणा) किनगांव राजा मध्ये दहशत एवढी वाढली की लोक इच्छा मरणाची परवानगी मागित आहे. विशेष म्हणजे अल्पसंख्यांक कुटुंबांना मिळत आहे. मौजे किनगांव राजा ता. सिंदखेड राजा जि.बुलडाणा येथील सौ. पुष्पा प्रकाश जैन
(सोनी) यांनी आज मा. जिल्हाधिकारी साहेब, बुलडाणा यांना इच्छा मरणाची परवानगी
मागितली.या बाबत थोडक्यात हकीकत अशी की, सौ. पुष्पा प्रकाश जैन (सोनी) यांची गट
नं.580 मध्ये 1.25 आर जमिन असून त्याला तारेचे कुंपण केलेले होते. अशी परिस्थितीअसतांना शेजारी शिवाजी भिकाजी काळुसे व परिवार यांनी आमची जमिन कमी भरते म्हणून सौ. पुष्पा प्रकाश जैन (सोनी) यांनी केलेले तारेचे कुंपन दादागीरीने काढून फेकून दिले व सदर जमिनीतील 20 गुंठे जमिन माझी आहे तुम्ही पेरायची नाही अशी धमकी दिली.
या गैरप्रकाराबाबत सौ. पुष्पा प्रकाश जैन (सोनी) यांनी रितसर पोलीस स्टेशन किनगांव राजा येथे तक्रार केली पण पोलीसाद्वारे हे सिव्हील मॅटर आहे म्हणून कारवाईस टाळाटाळ होत आहे व गुन्हेगारास पाठीशी घालत असे दिसते. सदर गैरअर्जदार बहुजन समाजाचे आहे त्यांच्याकडे 20 ते 25 माणसाचा जोडजमाव आहे. याचा गैरफायदा घेत विधायक मार्गाने सरकारी मोजणी न आणता शेजारी अल्पसंख्यांक स्त्री सौ. पुष्पा प्रकाश जैन (सोनी) यांच्या जमिनीवर दादागीरीने ताबा करण्याच्या प्रयत्नात आहे. या गुंडा गर्दीने सदर अल्पसंख्यांक कुटूंब प्रचंड दहशतीखाली आहे जर मला या
सुस्कृंत लोकशाही प्रधान महाराष्ट्रात न्याय मिळत नसेल व गुंडा गर्दी हवी होत असेल तर
मला असल्या लाचार जिवन जगण्यात स्वारस्थ नाही. त्यामुळे त्यांनी मा. जिल्हाधिकारी
साहेबांकडे इच्छा मरणाची परवानगी मागितली आहे.