बुलढाणा (हॅलो बुलडाणा) शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी सलग दुसऱ्यांदा विजय प्राप्त केला आहे.परंतु हा विजय निसटता होता त्यामुळे ते म्हणाले की, ‘अपेक्षित मते पडू शकली नाहीत पण हा विजय कार्यकर्त्यांना समर्पित आहे.’ दरम्यान काही मित्र पक्षांनी साथ दिली नसल्याची खंत ही त्यांनी व्यक्त केली.
आमदार गायकवाड यांनी विजय प्राप्त केल्यानंतर प्रतिक्रिया दिली की, मी जनतेच्या सेवेसाठी संघर्ष करत आहो. लोकांसाठी झटत असतांना व प्रचंड विकास कामे केली असताना अपेक्षीत मते पडू शकली नाही.लोकांना नेमकं काय हवं? हा यामुळे प्रश्न पडतो. तरी सुध्दा 91 हजारावर मतदारांनी आपल्याला विक्रमी पसंती दर्शवली. त्याबद्दल मतदारांचा मी ऋणी आहे.ही निवडणूक मी एकट्याच्या बळावर लढलो.
काही ठिकाणी मित्रपक्षही सोबत नव्हते.काही नेत्यांनी विरोधात काम केले. 35 ते 40 वर्ष काम करुन कोणी येऊन पैश्याच्या
जोरावर निवडणूक लढवत असेलतर मग
सामान्य कार्यकर्त्याने काय करावं? हा
प्रश्न मला पडला आहे. राज्यात सरकार येत असतांना इथे पराभव झाला असतातर
विकासाचा बट्ट्याबोळ झाला असता. पण
थोड्या मतांनी का होईना, विजय हा विजय असतो.. तो कार्यकर्त्यांना समर्पीत करतो,
असे आ.संजय गायकवाड यांनी म्हटले.










