बुलढाणा (हॅलो बुलडाणा) महायुतीने दमदार विजय मिळविला असून,महाविकास आघाडीचा धुराळा उडाला आहे.फटाक्यांच्या आतिषबाजीत महायुतीचा जल्लोष सुरू असून,’बाप तो बाप रहेगा!’ एकच गाणं वाजतय!
मलकापूर विधानसभा मतदारसंघात भाजपाचे चैनसुख संचेती यांनी 263 97 मतांनी विजय प्राप्त केला.त्यांनी काँग्रेसचे राजेश एकडे यांना पराभूत केले आहे.बुलढाणा विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाची आमदार संजय गायकवाड यांनी 841 मतांनी विजयी पताका फडकवली असून महाविकास आघाडीच्या उबाठा गटाच्या उमेदवार जयश्रीताई शेळके यांना त्यांनी पराभूत केले.चिखली विधानसभा मतदारसंघात भाजपाच्या श्वेता ताई महाले यांनी काँग्रेसच्या राहुल बोंद्रे यांना पराभूत करत 3201मतांनी आघाडी घेतली.सिंदखेड राजा मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार मनोज कायंदे यांनी बाजी मारली.त्यांनी 4650 मतांनी दिग्गज आमदार आणि मंत्री राहिलेले डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांचा पराभव केला आहे शिवाय महायुतीचे डॉक्टर शशिकांत खेडेकर यांना देखील पराभवाची धूळ चारली.मेहकर मध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सिद्धार्थ खरात यांनी 4819 मतांनी विजय मिळविला असून सलग तीनदा निवडून येणाऱ्याशिवसेना शिंदे गटाच्या डॉक्टर संजय रायमुलकर यांना चारी मुंड्या चीत केले.तसेच येथेच डॉक्टर ऋतुजा चव्हाण यांना सुद्धा पराभव पत्करावा लागला.खामगाव विधानसभा मतदारसंघात भाजपाचे आकाश फुंडकर यांनी विजयश्री खेचून आणत 2547 मतांनी मताधिक्य घेऊन राणा दिलीप कुमार सानंदा यांना पराभूत केले आहे.तसेच जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघात भाजपाचे डॉक्टर संजय कुटे 18 771 मतांनी निवडून आले असून त्यांनी काँग्रेसच्या डॉक्टर स्वाती वाकेकर यांचा दारुण पराभव केला आहे.
▪️ही असतील का पराभवाची कारणे?
संविधान बचावचा काँग्रेसने केलेला वार भाजपाला वाचविता आला नाही. परंतू, यापासून भाजपाने धडा घेतला आणि महाविकास आघाडीचे फेक नेरेटीव्ह कसे असते हे वारंवार सांगत जनतेत प्रचार सुरु केला होता.यानंतर मध्यप्रदेशमध्ये लोकप्रिय ठरलेली लाडकी बहीण योजना आणून महायुतीने महिलांमध्ये उत्साह आणला, एवढा की मोठ्या प्रमाणावर महिलांनी बाहेर पडत मतदान केले. मविआने 3000 रुपये देण्याचे सांगितले तरी जे देतायत त्यांनी 2100 केल्याने महिलांनी त्यांच्यावर जास्त विश्वास दाखविला. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, पंतप्रधान मोदींनी ‘एक है तो सेफ है’चा नारा दिला. त्यातच काँग्रेसला मुस्लिम संघटनांचे पाठिंब्यांच्या अटीचे पत्र व्हायरल झाले, या लोकांचे नेत्यांसोबतचे फोटो व्हायरल झाले आणि हिंदुत्ववादी मते एकगठ्ठा महायुतीच्या बाजुने फिरली. जे मविआच्या बाजुचे होते त्यांचेही मतपरिवर्तन झाले आणि त्यांचीही मते महायुतीकडे वळली अशी राजकीय जाणकार सांगत आहेत.