spot_img
spot_img

💥ब्रेकिंग! महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना धमक्या! -एसपींना सुरक्षेसाठी दिले निवेदन! -जयश्रीताई म्हणाल्या पराभवाची परिस्थिती पाहता विरोधकाचा केविलवाणा प्रयत्न!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) पराभवाच्या चिंतेने प्रतिस्पर्धी उमेदवार खवळलेत! त्यांचे काही पदाधिकारी व कार्यकर्ते महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांना मतदानाच्या दिवसापासून तर आतापर्यंत दबाव टाकून धमक्या देण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत.महाविकास आघाडीचा विजय निश्चित असून उद्या मतमोजणीच्या पार्श्वभूमीवरमहाविकास आघाडीचे नेते व पदाधिकाऱ्यांना सुरक्षा पुरविण्यात यावी अशी मागणी महाविकास आघाडी उबाठा गटाच्या उमेदवार जयश्रीताई शेळके,पदवीधर शिक्षक आमदार धीरज लिंगाडे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदनातून केली आहे.

बुलढाणा विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड व महाविकास आघाडीच्या जयश्रीताई शेळके यांची थेट लढत होणार असून उद्या मतमोजणी आहे. दरम्यान प्रतिस्पर्धी उमेदवाराकडून महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न मतदानाच्या दिवसापासून आतापर्यंत होत असल्याची तक्रार जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदनातून करण्यात आली आहे जयश्रीताई शेळके म्हणाल्या की,हा विरोधकांचा केविलवाणा प्रयत्न आहे.उद्या मतमोजणीला ही पराभवाची परिस्थिती लक्षात घेता त्यांचे काही कार्यकर्ते व पदाधिकारी अनुचित प्रकार घडविण्याची शक्यता नाकारता येत नाही. बुलढाण्यातील शांतता आम्हाला टिकवून ठेवायची आहे त्यामुळे मतमोजणी परिसरातील सीसीटीव्ही तसेच तगडा पोलीस बंदोबस्त ठेवावा अशी ही मागणी शेळके यांनी निवेदनातून केली आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!