बुलढाणा (हॅलो बुलढाणा) मतदारांमध्ये प्रचंड उत्साह व जल्लोष असून,या लोकशाहीच्या उत्सवात लोकशाही विरुद्ध हुकूमशाहीच्या बाजूने प्रथम मतदान केल्याचा आनंद मिळाला असे, महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्रीताई शेळके यांनी सकाळी मतदान केल्यावर ‘हॅलो बुलढाणा’ला सांगितले.
मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी मतदान करावे असे आवाहन देखील जयश्री ताई शेळके यांनी केले आहे.
बुलढाणा विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड व महाविकास आघाडीच्या जयश्रीताई शेळके यांची थेट लढत दिसून येत आहे.दरम्यान जयश्रीताई शेळके यांनी मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले असून हुकूमशाही विरुद्ध लोकशाही ला मी मतदान केल्याचे सांगितले आहे.