बुलढाणा (हॅलो बुलढाणा) राजकारणात काय होईल हे सांगता येत नाही.जळगाव जामोद मध्ये तर राजकारण इतके घाणेरडे झाले की उमेदवारावर प्राण घातक हल्ल्यापर्यंत पोहोचले.परिवर्तन महाशक्ती स्वराज्य पक्षाचे उमेदवार प्रशांत डिक्कर यांच्यावर अज्ञातांनी जीवघेणा हल्ला केल्याने ते गंभीर आहेत. प्रकृती चिंताजनक असल्याने अकोल्यातील ओझोन हॅास्पिटल मध्ये ICCU मध्ये त्यांना ॲाक्सिजन लावण्यात आले आहे.
लोकशाही राहिली नसून गुंडशाही वाढल्याचे हे संकेत आहेत.शेगाव नजीक सकाळी सहा वाजताच्या दरम्यान प्रशांत डिक्कर यांच्यावर विरोधकांकडून हल्ला करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.दरम्यान छत्रपती संभाजी राजे यांनी त्यांच्या प्रचारार्थ तीन सभा आणि एक रॅली काढली होती.विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली असून,गुंडशाहीचा प्रयोग करण्यात येत असल्याने खरंच लोकशाही जिवंत आहे का असा प्रश्न त्यांच्या समर्थकांनी उपस्थित केला आहे.