spot_img
spot_img

💥पॉलिटिक्स! शिंदेसेना- उद्धवसेना यांच्या अटीतटीच्या सामन्यात सकाळपासूनच रंगत ! -मतदान केंद्रावर दोन्ही समर्थकांची मतदानासाठी लगबग! -मतदान टाळू नये! ‘हॅलो बुलढाणा’चे आवाहन!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) शिंदसेना- उद्धवसेना यांच्या अटीतटीच्या लढतीत सकाळी सात वाजता पासून रंगत आली असून,दोन्ही पक्षांच्या समर्थकांची मतदान केंद्रांवर लगबग दिसून येत आहे.शिवसेना शिंदे गटाचे महायुतीचे उमेदवार विद्यमान आमदार संजय गायकवाड आणि उद्धव ठाकरे गटाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्रीताई शेळके यांच्यात काट्याची टक्कर पाहायला मिळत आहे.

मतदान हा आपला महत्त्वाचा हक्क, अधिकार आहे. त्यामुळे मिळालेल्या या अधिकाराचा वापर प्रत्येक भारतीय नागरिकाने प्राधान्याने करावा आणि मतदानाचे कर्तव्य पार पाडावे. आपल्या देशाने लोकशाही स्वीकारली आणि आपण ही पद्धती अजूनही टिकवून ठेवली आहे. लोकशाहीने अनेक सुविधा, अधिकार, हक्क आपल्याला दिले आहेत. दर पाच वर्षांनी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत मतदारांनी बजाविलेल्या मतदानाच्या अधिकारातून केंद्रात शासन स्थापन होते. येथे चांगली माणसे, राज्यकर्ते असावेत, असे एक सुजाण नागरिक म्हणून आपल्याला वाटत असेल, तर कोणतीही सबब न सांगता प्रत्येकाने मतदान करावे.
चांगले राज्यकर्ते निवडून येण्यासाठी आपल्या प्रत्येकाचे एकेक मत महत्त्वाचे आहे. ते देशातील लोकशाहीच्या भवितव्यासाठी आणि आपल्या पुढील पिढीसाठीही खूप गरजेचे आहे. त्यामुळे मतदान टाळू नये. मतदानाच्या माध्यमातून देशातील नागरिकांना देशात कसा बदल हवा आहे, त्यांना कसे राज्यकर्ते हवे आहेत हे कळते. त्या दृष्टीनेही मतदान महत्त्वपूर्ण आहे.त्यामुळे प्रत्येकांनी मतदान करावे असे आवाहन ‘हॅलो बुलढाणा’ करत आहे.दरम्यान बुलढाणा विधानसभा मतदारसंघात 80 ते 90 टक्के मतदान होणार असल्याचा अंदाज आहे.ईव्हीएम मशीन कुणाला प्रसन्न होते?हे येणारी वेळ सांगणार असून,याचे संकेत दिवसभरात ‘हॅलो बुलढाणा’ च्या माध्यमातून लाखो वाचकांना मिळणार आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!