बुलढाणा (हॅलो बुलडाणा) मराठा आरक्षण विषयी मनोज जरांगे पाटील यांनी पुकारलेल्या उपोषणात झालेल्या लाठीचार्ज प्रकरणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून मराठ्यांनो मतदान करताना हे विसरू नका’ असा संदेश प्रसारित करण्यात येत आहे.
मराठा योद्धा म्हणून जरांगे पाटील यांनी उपोषण केले होते.परंतु पोलिसांनी या उपोषणात लाठीचार्ज करून हे प्रकरण देशभर पोहोचले.दरम्यान मनोज जरांगे पाटील निवडणुकीत उतरून इतका जवाब पत्थर से देंगे असे म्हणाले होते. ते विधानसभा निवडणूक लढविणार होते परंतु त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली. ते म्हणाले की,
मराठा समाज संभ्रमात आहे असं पसरवले जात आहे, मात्र मराठा समाज संभ्रमात नाही. ज्यांना स्वत:ला निवडून यायचं आहे, ते संभ्रम निर्माण करत आहेत. समाजाला सर्व माहीत आहे. ज्याला पाडायचे त्याला पाडा, ज्याला निवडून आणायचे त्याला निवडून आणा, मी स्पष्ट सांगितलं आहे. ज्यांनी अन्याय केला डोक्याच्या चिंधड्या केल्या त्यांना सोडायचं नाही. आपल्या मागणीशी संबंधित असणाऱ्यांचे व्हिडीओ करून घ्या, जो आपल्या मागण्याशी सहमत राहील त्यांला निवडून आणा, पण तो व्हिडीओ व्हायरल करू नका असं मनोज जरांगे पाटील यांनी तत्पूर्वी म्हटले आहे.परंतु आता मात्र सोशल मीडियावरमराठा आरक्षण विषयी मनोज जरांगे पाटील यांनी पुकारलेल्या उपोषणात झालेल्या लाठीचार्ज प्रकरणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून मराठ्यांनो मतदान करताना हे विसरू नका’ असा संदेश प्रसारित करण्यात येत आहे.
पहा व्हायरल झालेला व्हिडिओ