बुलढाणा(हॅलो बुलढाणा) विधानसभेचे वेध लागले आणि एकमेकांवर चिखलफेक, आंदोलन करण्याची तयारी सुरू झाली आहे. आजही काँग्रेसने महायुती सरकार विरोधात प्रतिकात्मक पुतळ्यावर चिखलफेक आंदोलन करत प्रतिकात्मक पुतळा जाळला.
राज्यातील जनता अनेक समस्यांना जात असताना महायुतीचे सरकार त्या समस्यांना जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्या नेतृत्वाखाली बुलढाण्यातील जयस्तंभ चौकात महायुतीचे प्रतीकात्मक पुतळ्यावर चिखल फेक करत प्रतीकात्मक पुतळा जाळून काँग्रेसने चिखलफेक आंदोलन केले आहे. केंद्र आणि राज्य सरकारने अनेक अन्यायकारक निर्णय घेतले आहेत. यामुळे समाजातील सर्वच घटक अनेक समसयांना तोंड देत आहेत. मात्र, सरकार केवळ बघ्याची भूमिका घेऊन आहे..संपूर्ण महाराष्ट्रभरात हे आंदोलन सुरू आहे त्याच धर्तीवर आज बुलढाण्यात देखील हे आंदोलन होतंय सध्या महायुतीचं सरकार आहे. हे ट्रिपल इंजिनचं सरकार आहे. हे अत्यंत अकार्यक्षम महा भ्रष्टाचारी असं हे सरकार आहे. पावसाची वाट पाहणारा शेतकऱ्यांना अजून पर्यंत नुकसान भरपाई मिळालेली नाही..,पिक विमा ची रक्कम ही मिळाली नाही ,शेतकऱ्याच्या मालाला सध्या भाव नाही. अशा या परिस्थितीमध्ये शेतकरी खूप मोठ्या प्रमाणात अडचणीत आहे. या सोबतच महाराष्ट्रातपोलीस भरती सुरू आहे. ती चिखलामध्ये सुरू आहे. पडक्या पावसात सुरू आहे. या सरकारला त्याचं काहीही घेणं देणं नाही. या सरकारला या महाराष्ट्रात महिलांवर अत्याचार होत आहे. त्याचाही काही घेणं देणं नाही. हे सरकार फक्त मलाई खाण्यामध्ये व्यस्त आहे अशामुळे या महाभ्रष्टाचारी आणि अकार्यक्षम महायुती सरकार विरोधात आम्ही आज चिखलफेक आंदोलन करत आहोत….हा चिखल आज आम्ही यांच्या पोस्टरला लावत आहोत .पण येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातला जो मतदार आहे तो या भाजपाच्या आणि महायुतीच्या मतदानाच्या रूपातून यांना चिखल पाजल्याशिवाय राहणार नाही. यांना पराभूत केल्याशिवाय राहणार नाही आणि महाराष्ट्रातून यांना काढून टाकल्याशिवाय राहणार नाही. शाहू फुले आंबेडकरांचं जे सरकार आहे विचाराचं ते पुन्हा आल्याशिवाय राहणार नाही.मोदी सरकारने सत्तेमध्ये येण्याच्या आधी आम्ही शेतकऱ्यांना हमीभाव देऊ सांगितलं होतं दुप्पट भाव देऊ म्हणून सांगितलं होतं पण दहा वर्षे झालं त्यांनी काही केलं नाही. 500 शेतकऱ्यांना शहीद जावं लागलं त्यावेळेस त्यांनी तीन काळे कायदे मागे घेतले आणि आज तोंडाला पान पुसण्याचा प्रकार होतोय हे सरकार शेतकरी विरोधी सरकार आहे असा आरोप यावेळी करण्यात आला आहे… यावेळी काँग्रेसचे विधान परिषद आमदार धीरज लिंगाडे उपाध्यक्ष संजय राठोड यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.सरकारविरोधी जोरदार घोषणाबाजीने यावेळी परिसर दणाणून गेला होता.