spot_img
spot_img

💥पॉलिटिक्स! भगीरथ, गरुडझेप, सलाम बळीराजा, ग्रामदरबार प्रकल्पांना मतदार देताहेत उजाळा ! -राहुल भाऊ बोंद्रे यांनीच केला चिखली मतदारसंघाचा शाश्वत विकास!

चिखली (हॅलो बुलढाणा) विश्वास ठेवा बदल होणार..! हे बीद्र घेऊन चिखली विधानसभा मतदारसंघात जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल भाऊ बोंद्रे यांनी मतदारांना आवाहन केले होते. त्यानंतर मतदारांनी टाकलेला विश्वास राहुल भाऊ बोंद्रे यांनी सार्थकी लावत चिखली विधानसभा मतदारसंघाचा शाश्वत विकास घडवून आणला. भगीरथ जलसंजीवनी प्रकल्प, गरुड झेप शिक्षण प्रकल्प , सलाम बळीराजा कृषी प्रदर्शनी, भूमिपुत्र ग्रामदरबार, दिव्यांग सेवा महायज्ञ यासारख्या विविध उपक्रमासह, हजारो कोटी रुपयांची विकासात्मक कामे मतदारसंघात राहुल भाऊ बोंद्रे यांनी केली. चिखली विधानसभा मतदार संघात झालेल्या शाश्वत विकासाला उजाळा देत मतदारांनी राहुल भाऊ बोंद्रे यांच्या पाठिमागे उभे राहण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

महाराष्ट्रातील संत परंपरेने गोरगरिबांच्या सेवेतूनच ईश्वर प्राप्तीचा मार्ग सांगितला. याच विचारांवर चालत कर्मयोगी तात्यासाहेब बोंद्रे यांनी दिव्यांगाना कृत्रिम हात-पाय लावून देणे आणि नेत्ररोग्यांवर उपचार करण्याची परंपरा सुरू केली. राहुल बोंद्रे यांनी हीच जनसेवेची परंपरा पुढे चालवत आजवर दीड लाखांपेक्षा जास्त गरजूंना आरोग्य सेवा पुरवली आहे. दखल घेण्यासारखा भाग म्हणजे इतक्या लोकांना मदत केल्यावरही या मदतीचे राजकीय भांडवल त्यांनी कधीच केले नाही किंवा या लोकांपासून कसलाही राजकीय लाभ मिळवण्याची अपेक्षाही न ठेवता त्यांनी ही सेवा केली. हे खरंच वाखाणण्याजोगे आहे.
राहुल भाऊ बोंद्रे आमदार असताना मतदारसंघांमध्ये गरुड झेप शिक्षण प्रकल्पासारखे विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर सकारात्मक बदल घडवणारे प्रकल्प राबवले. या माध्यमातून जिल्हा परिषद शाळांमध्ये शिकणाऱ्या गोरगरीब विद्यार्थ्यांना ई लर्निंगचा अनुभव घेता आला. गरुड झेप शिक्षण प्रकल्पाच्या माध्यमातून अनेक शाळांमध्ये प्रोजेक्टर संच वाटण्यात आले. त्यामुळे त्यांना तंत्रज्ञानाच्या सहाय्याने विद्यार्थांना अनेक नवनवीन गोष्टी शिकता आल्या. विशेष म्हणजे या प्रकल्पाची तात्कालीन शिक्षणमंत्री विनोद तावडे, व r ग्रामविकास राज्यमंत्री दिपक केसरकर यांनी राज्यपातळीवर दखल घेतली होती.
▪️जलसंजीवनी प्रकल्प ठरला शेतकऱ्यांसाठी भगीरथ!

भगीरथ जलसंजीवनी नदी खोलीकरण प्रकल्पाच्या माध्यमातून नद्यांमधील गाळ काढून नद्यांची पाणी वाहून नेण्याची क्षमता वाढवण्यात आली. ज्यामुळे हजारो शेतकऱ्यांना सिंचनासाठी फायदा झाला. अन् दुष्काळावर मात करता आली. १५ हजार एकर शेती सिंचनाखाली आल्याने या विकास कामाचे राज्यस्तरावर कौतुक करण्यात आले. कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी हा प्रकल्प भगीरथ ठरला हे विशेष..!

▪️भूमिपुत्र ग्रामदरबार ठरला वंचितांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणारा..!

राहुल बोंद्रेंनी आमदार असताना भूमिपुत्र ग्राम दरबार या कार्यक्रमाच्या माध्यमातून संजय गांधी निराधार योजनेच्या दहा हजारावरून अधिक केसेस मंजूर करून घेतल्या. अमरावती विभागाचे तत्कालीन आयुक्त ठाकूर यांनी संपूर्ण अमरावती विभागात असा उपक्रम राबवला गेला पाहिजे असे परिपत्रक काढले. सरकारी लाभापासून वंचित असणाऱ्या लोकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्याचे काम भूमिपुत्र ग्रामदरबाराने केल्याचे अनेक लाभार्थी सांगतात. नको तेथे कमानी, नको तेथे सौंदर्यीकरण, अवाजवी खर्च करून उभारलेल्या दिखाऊ विकासापेक्षा लोकांचे मूलभूत प्रश्न सोडवणारा विकास हाच खरा शाश्वत विकास असू शकतो, हे राहुल बोंद्रे यांनी त्यांच्या कृतीतून दाखवून दिले आहे.

▪️अन्यायावर प्रहार करणारे राहुलभाऊ!

राहुल बोंद्रे फक्त आमदार असतानाच लोकांची कामे करायचे असे नाही. तर आमदार नसतानाही त्यांनी लोकांच्या रोजी रोटी आणि पोटापाण्याच्या विषययांसाठी सतत संघर्ष केला. बांधकाम कामगारांना भांडी वाटप इतर साहित्य मिळावे यासाठी आंदोलन केले. त्यानंतर लगेच कामगारांना घर संसार भांडी वाटप सुरू झाले. हजारो लोकांना घरकुल मंजूर झाल्यानंतरही शासन निधी देत नसल्यामुळे हजारो लाभार्थ्यांचे घरकुलाचे बांधकाम रखडले. हजारो लोक कर्जबाजारी झाले. या विरोधात राहुल बोंद्रे यांनी चिखली तहसीलवर एल्गार मोर्चा काढला. त्यानंतर अनेक लाभार्थ्यांच्या खात्यावर घरकुलाचे काही हफ्ते पडले. परिणामी चिखली विधानसभा मतदारसंघाच्या शाश्वत विकासाची परंपरा कायम राखण्यासाठी राहुल भाऊ बोंद्रे यांच्या पाठीमागे सर्वच समाजातील मतदार एकवटल्याचे पाहायला मिळत आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!