spot_img
spot_img

💥EXCLUSIVE – माझं 70 वर्षाचा अनुभव! ‘जयश्री’ताईंचा विजय निश्चित! -ध्रुपदराव सावळे

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) माजी आमदार ध्रुपदराव सावळे यांनी महाविकास आघाडीच्या अधिकृत महिला उमेदवार जयश्रीताई शेळके यांचा विजय निश्चित असल्याचा ठाम विश्वास व्यक्त केला आहे. गांधी भवन येथे प्रचार रॅलीसभेत बोलताना त्यांनी आपल्या 70 वर्षांच्या राजकीय अनुभवातून या निवडणुकीचा अंदाज व्यक्त केला. सावळे म्हणाले, “जयश्रीताई शेळके या केवळ महाविकास आघाडीच्या उमेदवार नसून त्या जनतेच्या मनातील उमेदवार आहेत. त्यांनी आजवर लोकांच्या सुख-दुःखात सहभागी होत त्यांचं विश्वासू स्थान निर्माण केलं आहे.”

ध्रुपतराव सावळे यांच्या या वक्तव्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह संचारला असून निवडणूक प्रचाराला अधिक वेग आला आहे. त्यांनी जयश्रीताईंच्या लोकसंग्रहाचा आणि समाजसेवेचा विशेष उल्लेख केला. सावळे म्हणाले, “जयश्रीताईंच्या विजयासाठी मतदार मोठ्या प्रमाणावर मतदान करतील. त्या जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर आहेत आणि त्यांचं प्रामाणिक कार्यच त्यांना विजयी करेल.”

या निवडणुकीत महिला उमेदवार जयश्रीताई शेळके यांच्यावरील जनतेचा विश्वास आणि सावळे यांच्यासारख्या अनुभवी नेत्यांचा पाठिंबा यामुळे महाविकास आघाडीला बळ मिळालं आहे. ध्रुपतराव सावळे यांनी या निवडणुकीला जनतेचा कौल ठरेल, असा आत्मविश्वास व्यक्त करत जयश्रीताईंच निवडून येणार आहे असा विश्वास व्यक्त केलाय

प्रचार रॅलीत माजी केंद्रीय मंत्री मुकुल वासनिक,आ.धीरज लिंगाडे,जालिंदर बुधवत,माजी आ.हर्षवर्धन सपकाळ,नरेश शेळके, संजय राठोड,सुरेश सीनकर,दिलीप जाधव,विनोद बेंडवाल, सुनील सपकाळ सह विकास महाआघाडीचे सर्व मान्यवर पदाधिकारी व हजारोच्या संख्येत महिला व पुरुष कार्यकर्ते उपस्थित होते

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!