बुलढाणा (हॅलो बुलडाणा) महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा करत सोयाबीनसाठी ७००० रुपयांचा दर देण्याचे आश्वासन दिले आहे. काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी ही घोषणा केली असून, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील याबाबत छत्रपती संभाजीनगरमधून सुतोवाच केले आहे.
या घोषणेच्या अनुषंगाने काँग्रेस नेत्या व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ट्विटर द्वारे शेतकऱ्यांसाठी ही मोठी घोषणा केली. काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना शेतकऱ्यांना सल्ला दिला की, त्यांनी सध्या सोयाबीन विक्रीसाठी थोडा वेळ थांबावे, कारण महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर त्यांना सोयाबीनसाठी ७००० रुपये दर हमखास मिळेल.
या घोषणेमुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, त्यांनी महाविकास आघाडी सरकारकडून आशा व्यक्त केली आहे की, या वचनाची अंमलबजावणी महाविकास आघाडीचे सरकार येताच होईल सोयाबीन दरातील वाढ ही शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळवून देणारी ठरेल, अशीही अपेक्षा शेतकऱ्यांमध्ये आहे.