बुलढाणा (हॅलो बुलढाणा) महाविकास आघाडीच्या तथा उबाठा शिवसेना गटाच्या उमेदवार जयश्रीताई शेळके यांच्या प्रचारार्थ अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव खा.मुकुल वासनिक यांची आज 17 नोव्हेंबर रोजी दुपारी 1 वाजता झंझावाती पदयात्रा आयोजित केली आहे.चिखली रोडवरील मोठी देवी मंदिर येथे नतमस्तक होऊन या प्रचार दौऱ्याला सुरुवात होईल. सर्वच स्तरातून जयश्रीताईंना समर्थन मिळत असल्याने जिजाऊ- सावित्री-रमाईची लेक ‘जय’ श्री खेचून आणणार असल्याचा विश्वास व्यक्त होत आहे.
महाविकास आघाडीतील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाच्या उमेदवार जयश्रीताई सुनिल शेळके यांच्या मशालीचा लखलखाट दिसून
येत आहे.खासदार मुकुल वासनिक हे नेहमी दिल्लीत सक्रिय असतात.विरोधी पक्षनेते खा.राहुल गांधी यांचे ते निकटवर्तीय आहेत.सध्या बुलढाणा विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. दिग्गज नेत्यांची सभेला हजेरी लागत आहे. दरम्यान महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्रीताई शेळके यांच्या प्रचारासाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव खा.मुकुल वासनिक यांची आज 17 नोव्हेंबर रोजी दुपारी 1 वाजता झंझावाती पदयात्रा पार पडणार आहे. पदयात्रा विराट ठरणार असून,सर्व महाविकास आघाडीच्या व घटक पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी तसेच नागरिकांनी पदयात्रेत सहभागी व्हावे , असे आवाहन आयोजकांनी केले आहे.