spot_img
spot_img

💥ब्रेकिंग! साखरखेर्डात प्रचारार्थ गेलेल्या राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांना ग्रामस्थांनी परतून लावले! -गद्दार म्हणून डिवचले! महायुतीविरुद्ध गुंजतोय गद्दार सरकारचा नारा! -यंदा महायुतीच्या उमेदवारांसाठी धोक्याची घंटा!

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) सध्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात असून प्रचाराला गती आली आहे.परंतु या प्रचारदौऱ्या दरम्यान कुण्या कुण्या गावांमध्ये संतप्त प्रकार समोर येत आहे. साखरखेर्डात तर काल महायुतीच्या अजित पवार गटाच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी गेलेल्या नेते व पदाधिकाऱ्यांना गावकऱ्यांनी अक्षरशः गावातून हाकलून लावले. ‘गद्दार’म्हणून पदाधिकाऱ्यांना डिवचण्यात आले असून 150 ते 200 ग्रामस्थांच्या घोळक्यात एक पदाधिकारी व नागरिकांत हमरी तुमरी सुद्धा झाल्याचे चित्र होते.परिणामी ‘गद्दाराचा नारा सर्वच विधानसभा मतदारसंघात गुंजत असून यंदाची निवडणूक महायुतीसाठी धोक्याची घंटा ठरत आहे ठरत आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील 7 विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार निवडणुकीच्या रणसंग्रामात उतरले आहेत.प्रमुख पक्षांसह अपक्ष्यांचीही यावेळेस गर्दी पाहायला मिळाली.उमेदवारांच्या विजयासाठी प्रचार तोफा तापलेल्या आहेत.उमेदवारांसह पदाधिकारी व कार्यकर्ते पायाला भिंगरी बांधून गावोगाव पिंजून काढण्यात येत आहे.दरम्यान प्रत्येक विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीअजित पवार गटाविरुद्ध व महायुतीच्या काही उमेदवारांविरुद्ध ‘गद्दार सरकार’ अशा घोषणा मोठ्या प्रमाणावर ऐकाला मिळत आहेत.अनेक मतदार विधान संघात केवळ निधींचे फलक लावण्यात आले असून विकास केला नसल्याची ओरड आहे.पुन्हा विकासाचे गाजर दाखवण्यासाठी प्रचार जोरात सुरू आहे.काल साखरखेर्डा या गावात तब्बल 150 ते 200 ग्रामस्थांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना गावातून अक्षरशः हाकलून लावण्यात आले.शिवाय यावेळी हमरी -तुमरी सुद्धा झाली.गद्दार सरकारचे नारे ही लागले.त्यामुळे महायुतीविरुद्ध नागरिकांचा रोष वाढत असल्याचे दिसून येत आहे.याउलट महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी सर्वच विधानसभा मतदारसंघात अनुकूल वातावरण दिसून येत आहे.सातही विधानसभा मतदारसंघात गद्दारविरुद्ध रोष तर खुद्दारांसाठी जिव्हाळा निर्माण झाल्याचे चित्र आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!