बुलढाणा (हॅलो बुलडाणा) आमदार संजुभाऊ गायकवाड यांच्या प्रचारार्थ आज मोताळा शहरात बंजारा, लभान आणि नाईकडा समाजाचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला. या सोहळ्याला पोहरादेवी पीठाधीश्वर महंत श्री बाबुसिंगजी महाराज, त्यांचे बंधू महंत श्री प्रेमदास महाराज यांसह समाजाचे अनेक धर्मगुरू व महंत उपस्थित होते.
या वेळी महंतांनी उपस्थितांना संबोधित करताना संजुभाऊ गायकवाड यांना बुलढाणा विधानसभा मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन केले. त्यांनी गायकवाड यांच्या समाजसेवा, नेतृत्वगुण आणि विकासकार्याचे कौतुक केले.
या मेळाव्यात शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्षाचे पदाधिकारी, शिवसैनिक, तसेच समाजातील ज्येष्ठ-श्रेष्ठ मंडळी, महिला, तरुण, नायक आणि कारभारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
बंजारा समाजातील एकात्मता आणि आ.गायकवाड यांच्यावरील विश्वास यामुळे प्रचार मोहीम अधिक बळकट होत असल्याचे स्पष्ट झाले.महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून आ.संजय गायकवाड यांना समाजाचा भरघोस पाठिंबा मिळाला असून, निवडणुकीत त्यांना विजयाची आशा व्यक्त करण्यात आली.