चिखली (हॅलो बुलडाणा) महाराष्ट्र वाचवायचा आहे, शेतकरी जगवायचा आहे.यासाठी महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आणावयाचे आहे. असे प्रतिपादन धाड़स सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, शिवसेना (उबाठा) उपनेते शरद कोळी यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार राहूल बोंद्रे यांच्या प्रचारार्थ सभेत केले. यावेळी शिवसेना उबाठा चे जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवंत, हाजी दादू सेठ,नदू क-हाडे,दिपक वाघ, संतोष भाऊ, राम सुरडकर यांच्या सह मासरूळ परिसरातील कोळी बांधव व नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.विशेष बाब म्हणजे, याच ठिकाणी सातगाव येथील शाहीर प्रकाश हिवाळे यांनी पक्ष प्रवेश केला.
मासरूळ येथील प्रचार सभेत पुढे बोलताना शरद कोळी म्हणाले की, महायुतीच्या कार्यकालात लाडकी बहीण योजनेचा कसा फज्जा उडाला याचा प्रखर शब्दात खुलासा केला. गोरगरिबांच्या लेकरांचा शिक्षणाचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यांना फी मध्ये सवलत नाही. आम्ही फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रात जन्माला आलो, यांनी आम्हाला महायुतीच्या लोकांनी हिंदूत्व शिकवू नये. आम्ही वाल्या कोळ्यांच्या कुळातील लोक आहोत आमचा अत्यंत ज्वलंत इतिहास आहे. हे त्यांनी विसरू नये. सन्मानिय माजी मुख्यमंत्री उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या झालेली शेतक-याची कर्जमाफी आणि आज महायुतीच्या कार्यकालात शेतकरी वर्गाची झालेली अधोगती आपण पाहतो आहोत. शेती मध्ये मशागतीसाठी केलेला खर्च निघेनासा झाला आहे. नेपाळ मध्ये पैदा झालेली ती राणे ची औलाद काय म्हणती, डीएनए टेस्ट करा. अरे, याचेच तिघांचे तोंड वेगवेगळे आहेत, खरे तर तुम्हीच करून घ्या म्हणा, हे तर फडणवीस यांचे पाळीव कुत्रे आहेत.विधानसभेत महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री व्हावा यासाठी चिखली विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार राहूल बोंद्रे यांना ५० हजारांच्या मताधिक्याने विजयी करा.
महाविकास आघाडीचे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार राहूल सिध्दीविनायक बोंद्रे हे मतदार बांधवांना संबोधित करताना म्हणाले की, आताच शरद कोळी सांगितले की, आमच्या समाज बांधवांच्या समस्या, प्रश्नांना विधानसभेत वाचा फोडली जावी. मी आपणास शब्द देतो, महादेव कोळी समाज बांधवांच्या ज्या समस्या आहेत. जात प्रमाणपत्रासारखे जे काही प्रश्न आहेत. ते नुसते विधानसभेत मांडणार नाही तर त्यासाठी वेळप्रसंगी सरकारशी भांडल्याशिवाय रहाणार नाही. या विधानसभा निवडणुकीनंतर महा विकास आघाडीचे सरकार महाराष्ट्रात येणार ही काळ्या दगडावरील रेघ आहे. सध्या सोयाबीनचे दर ३० रूपये किलो आहेत. चिखली नगर परिषद मध्ये प्रशासकीय कार्यकाळ सुरू असल्याने ती विद्यमान आमदारांच्या अधिपत्याखाली असलेल्या या नगर परिषदेच्या कचरा गोळा करण्यासाठी च्या टेंडर चा भाग ३५ रूपये किलो आहे. कच-यापेक्षा आपल्या सोयाबीनचे भाव कमी आहेत. मागील काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांच्या सोयाबीनला भाव नाही म्हणून शेतकरी वर्गाने आपल्या रक्ताने निवेदन लिहून ते मुख्यमंत्र्यांना देण्याचा प्रयत्न केला मात्र, पोलीसांनी ते फाडून टाकले. शेतकरी बांधवांच्या रक्ताचा अपमान करण्याचे पाप महायुतीच्या सरकार च्या काळात केले आहे. या वेळी मासरूळ परिसरात बहुसंख्य नागरिक उपस्थित होते