spot_img
spot_img

💥पॉलिटिक्स! देऊळघाटात मशाल पेटली ! -जयश्रीताई म्हणाल्या.. माझ्याकडे विकासाचे व्हिजन!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) महाविकास आघाडीच्या उबाठा गटाच्या उमेदवार जयश्रीताई सुनील शेळके यांच्या 14 नोव्हेंबर रोजीच्या प्रचाररॅलीने देऊळघाट दणाणून गेले होते.यावेळी जनतेने मशाल निशाणीला मताधिक्याने निवडून आण्याचा विश्वास व्यक्त केला.दरम्यान बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचा कायापालट करण्याचे जयश्रीताईंनी आश्वस्त केले.

निवडणूक म्हटली, की त्यात भरपूर उखाळ्या पाखाळ्या, वैयक्तिक टीका-टिप्पणी, आरोप-प्रत्यारोप यांची राळ उडते. अशा गोष्टींमुळे लोकांचे मनोरंजन होते खरे; पण त्यात सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावण्यासाठीचे मूळ उद्दिष्ट बाजूला पडते.परंतु जयश्रीताई विकासाचे व्हिजन घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या असून त्यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे.14 नोव्हेंबर रोजी देऊळघाट येथे त्यांनी काढलेल्या प्रचार रॅलीला प्रचंड प्रतिसाद मिळाला. या प्रचार रॅलीत महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते व देऊळघाट्यातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाली होते

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!