spot_img
spot_img

💥 पॉलिटिक्स! शिवसेनाच्या वाघाची डरकाळी गुंजतेय ! -आ. संजय गायकवाडांना कुणी कुणी दिलाय जाहीर पाठिंबा? -जनसंवाद मेळाव्यातून गायकवाडांना निवडून आणण्याची साद !

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार तथा विद्यमान आमदार संजय गायकवाड या वाघाची डरकाळी परिसरात प्रचारार्थ गुंजत असून,त्यांच्या समर्थनार्थ परीसरातील सुशिक्षित जनता एकवटल्याचे चित्र आहे. त्यांना पुन्हा विधानसभेत पाठविण्याचा निर्धार देखील व्यक्त होतोय!

14 नोव्हेंबर रोजी बुलढाणा,
सुंदरखेड,मोताळा,सागवन शहर व परिसरातील सर्व व्यापारी, प्राध्यापक, शिक्षक,उद्योजक, इंजिनिअर, सेवानिवृत्त कर्मचारी,जेष्ठ नागरिक, वैद्यकीय क्षेत्रातील सर्व डॉक्टर वर्ग, वकील संघ, औषधी दुकानदार तसेच सर्व महापुरुषांच्या स्मारकाचे पदाधिकारी,सर्व
भवनांचे प्रमुख पदाधिकारी यांच्यावतीने बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार संजय गायकवाड यांच्या समर्थनार्थ भव्य जनसंवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.या जनसंवाद मेळाव्यातून आ.गायकवाडांना निवडून आणण्याची साद घालण्यात आली.
यावेळी बुलढाणा जिल्ह्याचे भूमिपुत्र केंद्रीय केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, आमदार संजय गायकवाड, शिक्षक मतदार संघाचे आमदार श्रीकांत देशपांडे, बुलढाणा अर्बनचे सर्वेसर्वा राधेश्याम चांडक,डॉ. दीपक लद्दड,शिवसेना जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपूत, राजेशजी देशलहरा,डॉ. मधुकर पऱ्हाड, विष्णुपंत पाटील, कमलेश कोठारी, विजय बाफना, ऍडव्होकेट अजय दिनोदे, डॉ.दुर्गासिंग जाधव, डॉ.राहुल मेहेत्रे,पप्पूसेठ अग्रवाल, राजूसेठ जैस्वाल, डॉ. सुभाष जोशी,डॉ. संजय बोथरा, बाळासाहेब चौधरी,भाजपाचे नेते मोहन पवार, मंगेश बिडवे, प्रकाश वानेरे, अमित नारडिया यांच्यासह शिवसेना भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी तसेच नामांकित क्षेत्रातील सर्व व्यापारी,उद्योजक,डॉक्टर उपस्थित होते.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!