सिंदखेडराजा (हॅलो बुलढाणा) गेल्या काही दिवसांपासून सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघातील प्रचारार्थ लावण्यात आलेले गायत्री शिंगणे यांचे 12 ते 15 बॅनर आतापर्यंत अज्ञात पोस्टरफाड्यांनी फाडले आहेत. पोस्टर फाडण्याचे काम विरोधक करीत असून, ‘राजकारण सांभाळून करा’ असा सल्ला देत हुकूमशाही विरुद्ध लोकशाहीचा विजय होणार असल्याचा विश्वास गायत्री शिंदे यांनी व्यक्त केला आहे.
सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघात प्रचारासाठी लावण्यात आलेले गायत्री शिंगणे यांचे 12 ते 15 बॅनर अज्ञात समाजकंटकांनी फाडले.बॅनर कोणी फाडले यांची नावे माहित आहे परंतु मला कोणाचे नाव घ्यायचे नाही,बॅनर काढायचे तर नऊ ते दहा उमेदवार निवडणूक लढवीत आहेत परंतु माझे एकटीचे बॅनर का फाडल्या जात आहे असाही प्रश्न गायत्री शिंगणे यांनी उपस्थित केला आहे.सदर बॅनरवर स्व. भास्करराव शिंगणे म्हणजे आजोबांचा फोटो आहे. ते डॉ.राजेंद्र शिंदे यांचे वडील आहेत.त्यामुळे विरोधकांनी तेवढा तरी मानपान ठेवावा,असेही गायत्री शिंगणे म्हणाल्या.दरम्यान सिंदखेडराजात निवडणुकीचा माहोल प्रचंड तापला असून, राजकारणाचा स्तर घसरल्याचे चित्र आहे.