spot_img
spot_img

लोणार तालुक्यातील 32-हजार शेतकऱ्यांनी पीक-विमा भरला. लाभ मिळाला 3 शेतकऱ्यांना.!- शेतकरीपुत्र शैलश सरकटे काय म्हणतात बघाच!

  • बुलढाणा (हॅलो बुलढाणा)लोणार तालुक्यातील यावर्षी पेरणी झाली. नव्याने पिक-विमा भरण्याची वेळ आली.

परंतु अजूनही 2023-24 वर्षाचा शेतकऱ्यांचा पिकविमा विमाकंपनीकडे आणि प्रशासनाकडे प्रलंबित आहे.!
सदर योजनेतील पात्र शेतकऱ्यांना तात्काळ पिक-विमा अदा करण्यात यावा..! अशी मागणी शैलेश सरकटे यांच्याकडून करण्यात आली. नेहमीप्रमाणे कंपनीकडून अनास्था दिसून येत आहे.कुठलीही हालचाल विमा कंपनी आणि प्रशासनाकडून होताना दिसत नाही.!
आजवर मायबाप शेतकऱ्यांच्या हक्काची कुठलीच मदत त्यांना प्रशासनाकडून वेळआधी मिळताना दिसली नाही.!
पीकविमा कंपन्यांकडून त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम अदा व्हावी अशी मागणी सामाजिक करकर्ते,शैलेश  सरकटे यांनी कंपनी व प्रशासनाकडे केली आहे.!
लोणार तालुक्यातील एकूण 31643 शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता.
या पैकी नुकसान झाल्यानंतर 18054 शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे तक्रारी नोंदवल्या होत्या. त्यापैकी 4517 तक्रारी विमा कंपनीकडून स्वीकारण्यात आल्या, व 13537 शेतकऱ्यांच्या तक्रारी नाकारल्या (*रिजेक्ट*) करण्यात आल्या. विशेष म्हणजे मार्च 2024 मध्ये लोणार तालुक्यातील फक्त  तीनच शेतकऱ्यांना 23000 रुपये, पीकविमा नुकसान भरपाई पोटी अदा करण्यात आहे.
यातील सुधारित यादीनुसार तालुक्यातील 4017 शेतकऱ्यांना पीकविमा कंपनीकडून 4,कोटी 82,लक्ष रुपये नुकसान भरपाई साठी पात्र ठरले परंतु ती अद्यापही मिळणे बाकी आहे.!
महसुली मंडळांनी केलेल्या सर्वेनुसार शेतकऱ्यांचे वार्षिक उत्पन्न सरासरी इतके न झाल्याचे सर्वेत आढळून आले. मिळालेल्या माहितीनुसार 7119 शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून 2,कोटी-44,लक्ष रुपये नुकसान भरपाई अजूनही अद्याप मिळणे बाकी आहे.!
एकंदरीत आपण बघितलं तर लोणार तालुक्यातील 11436 शेतकऱ्यांची नुकसान भरपाई पीक-विमा कंपनीकडे प्रलंबित आहे.
11436 शेतकऱ्यांचे पिक-विमा कंपनीकडे 7 कोटी 27लक्ष रुपये प्रलंबित आहेत.!
प्रशासन व विमा कंपनीला आमचा सवाल आहे की गेल्या 1 वर्षापासून ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात का जमा झाली नाही आणि ती कधी जमा होणार. या प्रश्नाचे उत्तर देण्यात यावे आणि येत्या 30 तारखेच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पिक विमा नुकसान भरपाईची रक्कम जमा झाली नाही तर लोणार येथील कृषी-कार्यालयाच्या समोर शेतकऱ्यांच्या वतीने आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा सामाजिक कार्यकर्ते शैलेश सरकटे यांनी दिला आहे.!!
लोणार तालुक्यातील विंमा कंपनीच्या रेकॉर्ड नुसार फक्त या तीन शेतकऱ्यांना मिळाला पिक विमा नुकसान भरपाई अरुण दत्ता खेकळे गाव – गोत्रा रक्कम – 8491 २) गणेश रामचंद्र चव्हाण गाव – सावरगाव मुंढे रक्कम 2830 3) आसिफ खान अयाज खान गाव – पिंपळनेर रक्कम – 11970 या तीन शेतकऱ्यांना मिळाला 23292 रुपये पीकविमा .
शेतकऱ्याचे पिक नुकसान झाले त्यावेळेस अनेक वेळा शेतकऱ्यानं नुकसानीची तक्रार सादर करण्यासाठी विमा ॲप ऑनलाईन लिंक अडचण असल्याने अनेक शेतकऱ्यांना आपली विमा तक्रार सादर वेळ वाया जाऊन नुकसानीची तक्रार सादर करण्यापासून वंचित राहावे लागले. तर ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा तक्रार सादर केले होती अशा शेतकऱ्यांचा प्रत्यक्ष नुकसान पाहणी करताना कंपनीच्या काही प्रतिनिधींनी बऱ्याच शेतकऱ्याची आर्थिक लूट सुध्दा केल्या असल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!