बुलढाणा (हॅलो बुलढाणा) यंदाच्या विधानसभा निवडणुकीत काही असे उमेदवार निवडणूक रिंगणात उभे आहेत की, त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा ठपका आहे. विशेषता महाराष्ट्रात गाजत असलेल्या मलकापूर अर्बन बँक घोटाळा प्रकरणी कुप्रसिद्ध माजी आमदार चैनसुख संचेती महायुतीकडून निवडणूक लढवीत आहेत. त्यांच्या प्रचारार्थ नुकतीच अमित शहा यांनी सभा घेतली.त्यामुळे भ्रष्टाचारी उमेदवाराच्या प्रचाराला पाठबळ देणाऱ्या अमित शहां विषयी उलट सुलट चर्चा रंगली होती.कोट्यावधींचा भ्रष्टाचार करणारा माजी आमदार निवडून येणे तर दूरच परंतु अशांना पक्षश्रेष्ठी तिकीट देतातच कसे?असा प्रश्न उभा ठाकला आहे.
निवडणुक कुणीही लढऊ शकतो. लोकशाहीने सर्वांना अधिकार दिला आहे. निवडणूक लढवणे गुन्हा नव्हे.परंतु समाजात भ्रष्टाचार करून उजळ माथ्याने वावरत गुन्हेगारी वृत्ती लोकांचे नेतृत्व करण्यासाठी जर प्रयत्न करत असेल तर हे अयोग्य मानले जाते.मलकापूर विधानसभा मतदारसंघात मलकापूर अर्बन बँक मध्ये कोट्यावधी रुपयांचा घोटाळा करणारे माजी आमदार चैनसुख संचेती आता मतदारांना भूलथापा देत विकास करण्याच्या आश्वासन देत आहेत.संचेती यांनी मलकापूर अर्बन बँकेत घोटाळा करून तब्बल 400 च्या वर ठेवीदारांच्या आयुष्याच्या कमाईची धुळधान केली आहे. ठेवीदारांचे भविष्यच अंधकारमय करून टाकले.या बँक घोटाळा प्रकरणी औरंगाबाद येथील सभासदांच्या बैठकीतून चैनसुख संचेती यांना पोलिसांच्या फौज फाटेतून अक्षरशः फळ काढावा लागला होता.संतप्त ठेवीदारांनी त्यांच्या गाडीवर दगड भिरकावले होते.शिवाय बँक व्यवस्थापकाच्या कानशिलात लगावली होती.दरम्यान रिझर्व बँकेने मलकापूर अर्बन बँकेचा परवाना रद्द केला. एवढ्या मोठ्या भ्रष्टाचाराचे कांड करणाऱ्या माजी आमदार चैनसुख संचेती आता मलकापूर विधानसभा निवडणुक लढवीत आहेत.परंतु अशा भ्रष्टाचारी उमेदवाराला महायुतीने उमेदवारी दिली कशी? हा प्रश्न असून महायुती सरकार देखील भ्रष्टाचारी असल्याचा आरोप आता होत आहे.याचा परिणाम मतपेटीतून निश्चितच दिसून येईल अशी ओरड ऐकायला मिळत आहे.
क्रमशा: